आठवड्यातून 90 तास कामाचा सल्ला देणाऱ्या सुब्रह्मण्यम यांना अदर पूनावालांचा ‘करारा जवाब’, म्हणाले माझी बायको दर रविवारी…
तरुणांनी किती तास काम करावं? यावरून सुरू असलेल्या वादात आता सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी देखील उडी घेतली आहे.
तरुणांनी किती तास काम करावं? यावरून सुरू असलेल्या वादात आता सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणात महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ‘वर्क लाईल बॅलन्स’संदर्भात केलेल्या स्टेटमेंटला पाठिंबा दिला आहे. ‘रविवारी सुद्धा माझी पत्नी माझ्याकडे बघतच असते’, असं ट्विट पूनावाला यांनी केलं आहे. एल अँण्ड टीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यम यांनी तरुणांनी आठवड्यातून 90 तास काम केलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं, त्यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं असतानाच आता पूनावाला यांनी देखील त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.लोकांनी 90 तास काम केलं पाहिजे, कर्मचाऱ्यांनी तर रविवारी देखील सुट्टी घेतली नाही पाहिजे असं वक्तव्य सुब्रह्मण्यम यांनी केलं आहे. त्यावर आता विविध स्थरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत.
पूनावाला यांनी या संदर्भात ट्विटरवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, ‘आनंद महिंद्रा आपण बरोबर म्हटलं आहे, माझी बायको देखील विचार करते की मी एक सुंदर व्यक्ती आणि चांगला पती आहे, त्यामुळे रविवारी दिवसभर ती माझ्याकडे पाहात असते.’ पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘कामाच्या काँटेटी पेक्षा कामाची कॉलेटी अधिक महत्त्वाची असते.’ सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आनंद महिंद्रा यांनी म्हटलं होतं की,’हा वाद चुकीच्या दिशेनं जातोय, मी नारायण मूर्ती आणि दुसऱ्या कॉर्पोरेट लीडर्सचा खूप आदर करतो, पण माझं असं म्हणण आहे की आपण कामाच्या तासांपेक्षा कामाच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. ज्याचा संबंध हा 70 ते 90 घंटे काम करण्याशी नाहीये.
पुढे बोलताना आनंद महिंद्रा यांनी असं देखील म्हटलं होतं, की माझी पत्नी एक सुंदर स्त्री आहे, त्यामुळे तिच्याकडे बघायला मला आवडतं.या वादाची सुरुवात इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांच्यापासून सुरूवात झाली होती. तरुणांनी सत्तार तास काम केलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता एल अँण्ड टीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यम यांनी कामगारांनी 90 तास काम केलं पाहिजे, रविवारी देखील सुट्टी नाही घेतली पाहिजे असं वक्तव्य केलं त्यावर आता आदर पूनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.