कोरोना लस वितरणाचा प्लॅन तयार; लसीचा आपत्कालीन वापरही होणार; : आदर पुनावाला

सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी कोरोना लसी संदर्भात आज अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक माहिती दिली आहे. (Adar Poonawalla addressing press conference on COVID-19 vaccine)

कोरोना लस वितरणाचा प्लॅन तयार; लसीचा आपत्कालीन वापरही होणार; : आदर पुनावाला
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 8:00 PM

पुणे: सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी कोरोना लसी संदर्भात आज अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक माहिती दिली आहे. कोरोना लसीचा आपत्कालीन वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या दोन आठवड्यात केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यात येणार असल्याचं आदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं. तसेच कोरोना लस वितरणाचा प्लॅनही तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. (Adar Poonawalla addressing press conference on COVID-19 vaccine)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसीची निर्मिती सुरू असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. आदर पुनावाला आणि सिरममधील संशोधकांकडून त्यांनी लसीबाबतची माहिती घेतली. त्यानंतर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन यााबाबतची माहिती दिली. कोरोना लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून परवानगी घेण्यात येणार आहे. येत्या दोन आठवड्यात लायसन्सची मागणी करण्यात येणार असल्याचं पुनावाला यांनी सांगितलं.

कोरोना लसीची अंतिम चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्याचं सर्वात आधी वितरण भारतात करण्यात येईल. त्यानंतर आशिया खंडात या लसीचं वितरण करण्यात येणार आहे. आमच्याकडे कोरोना लसीच्या वितरणाचा प्लॅनही तयार आहे. येत्या जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींच्या निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाची लस तयार झाल्यावर त्याची घोषणा आरोग्य मंत्रालायकडूनच केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

लसीच्या किमतीवर चर्चा नाही

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिरममधील लस निर्मितीबाबतचा आढावा घेतला. त्यांच्याशी कोरोना लसीवर सखोल चर्चा झाली. लसीकरणाच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली. तसेच लसीकरणाच्या साठवणुकीचा आढावाही त्यांनी घेतला. मात्र कोरोना लसीच्या किमतीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. मोदींचा दृष्टीकोन अत्यंत समतोल वाटला. मोदींना लसीबाबतची खूप माहिती आहे. ते विविध लसींबद्दल भरभरून बोलत होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आदर पुनावाला यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • पंतप्रधान मोदींना लसीसंबंधीची खूप माहिती
  • मोदी विविध लसींबद्दल भरभरून बोलले
  • लसीकरणाच्या वितरणाचा प्लॅन तयार
  • युरोपियन देशही अॅस्ट्रा झेनेकोवर लक्ष ठेऊन
  • कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी 2 आठवड्यात परवान्यासाठी अर्ज करणार
  • लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात (Adar Poonawalla addressing press conference on COVID-19 vaccine)

संबंधित बातम्या:

Adar Poonawalla : आधी भारत नंतर आशिया खंडात लसीचं वितरण करणार; जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींचं लक्ष्य : पुनावाला

LIVE : कोरोना लसीच्या किंमतीवर मोदींसोबत चर्चा झाली नाही, पुनावाला यांची माहिती

मिशन कोरोना व्हॅक्सीन! अहमदाबाद, हैदराबादनंतर पंतप्रधान मोदी सिरममध्ये; संशोधकांशी साधला संवाद

(Adar Poonawalla addressing press conference on COVID-19 vaccine)

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.