‘निसर्ग चक्रीवादळाचा फटका, रायगडला विशेष आर्थिक पॅकेज द्या’, अदिती तटकरे मागणी करणार
वादळाचा पंचनामा झाल्यावर याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचेही अदिती तटकरे यांनी सांगितले. (Aditi Tatkare demand Special Package Nisarga Cyclone Affect)
रायगड : निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदिती तटकरे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. तसेच झालेले नुकसान भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी अदिती तटकरे यांनी सांगितले. या वादळाचा पंचनामा झाल्यावर याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचेही अदिती तटकरे यांनी सांगितले. (Aditi Tatkare demand Special Package Nisarga Cyclone Affect)
निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडून नुकसानीची माहिती घेतली. रायगड जिल्ह्यात वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसेच अनेक फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.
वादळामुळे या दोन नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील 13 ते 14 तालुक्यात फटका बसला आहे. त्यामुळे रायगडसाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर पंचनामा झाल्यावर या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
रायगडमध्ये सध्या नुकसानीचा आकडा सांगता येणार नाही. त्यामुळे गुरुवारी (4 जून) संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. तसेच या नुकसानीचा पंचनामा पालकमंत्र्यांनी सांगितलं. रायगडमधील 18 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्याने जिवीतहानी टळल्याचं सांगितलं. सर्व रस्ते आणि वीजपुरवठा प्राधान्यानं पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले. (Aditi Tatkare demand Special Package Nisarga Cyclone Affect)
संबंधित बातम्या :
संकटकाळात महाराष्ट्र एक, मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांचे आभार : मुख्यमंत्री
चक्रीवादळ दूर होण्यासाठी पुढील 6 तास महत्वाचे, सर्वत्र पाऊस कोसळत राहणार : हवामान विभाग