सत्तारांनी केलेल्या छोटा पप्पू या विधानावर आदित्य ठाकरेंचे सडेतोड उत्तर, म्हणाले…
आदित्य ठाकरे यांच्यावर अब्दुल सत्तार यांनी छोटा पप्पू असा उल्लेख करत जहरी टीका केली होती, यावेळी आदित्य ठाकरे गोधडीत होते तेव्हा आम्ही राजकारणात होतो असंही सत्तार यांनी म्हंटलं होतं.
अकोला : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर ठाकरे गट विरोध शिंदे गट असा नवा सामना राज्यात सुरू झाला आहे. असे असतांना मात्र शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत थेट छोटा पप्पू असल्याचा उल्लेख करत जहरी टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी पप्पू या विधानावर सुरुवातीला बोलणं टाळलं होतं मात्र अकोला येथील सभेत अब्दुल सत्तार यांचा आदित्य ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, मला छोटा पप्पू म्हणाले, असेल मी छोटा पप्पू… पण मला नावं ठेऊन महाराष्ट्राची सेवा होत असेल तर मला आणखी शंभर नावं ठेवा, आणि महाराष्ट्राची सेवा करा. या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रभर पळवून लावले की नाही ? आणि असेच पळवत ठेवणार, पळवून लावणार, तुम्ही जी गद्दारी केली ती गद्दारी महाराष्ट्राच्या जनतेला पटलेली नाहीये. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
आजपासून आदित्य ठाकरे हे मराठवाडा येथील अकोला, सिल्लोड या भागात दौऱ्यावर असून शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदार संघात दौरे करत सभा घेत आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावर अब्दुल सत्तार यांनी छोटा पप्पू असा उल्लेख करत जहरी टीका केली होती, यावेळी आदित्य ठाकरे गोधडीत होते तेव्हा आम्ही राजकारणात होतो असंही सत्तार यांनी म्हंटलं होतं.
एकाच दिवशी अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना तीन वेळा पप्पू म्हणून उल्लेख करत टीका केली होती, त्याला आठवडाभरानंतर आदित्य यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरे यांनी मागील दोन आठवड्यापासून राज्यात जिथे जिथे आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे तिथे जाऊन आदित्य ठाकरे हे सभा घेत असून जोरदार हल्लाबोल करत आहे.
आदित्य ठाकरे नाशिक आणि पुणे दौऱ्यावर असतांना अब्दुल सत्तार परभणी दौऱ्यावर होते, शेतात पाहणी करत ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत आदित्य यांच्या मागणीवर सत्तार यांनी टीका केली होती.
दरम्यान अकोला दौऱ्यावर असलेल्या अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करत असतांना गद्दार मंत्री म्हणत सत्तार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
एकूणच शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना सुरु असतांना आदित्य ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यात छोटा पप्पू या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.