राजकारणातलं वाढलेलं प्रदूषण संपणार, आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात
आदित्य ठाकरे यांनी भाजपलाही नाव न घेता चिमटे काढले आहेत. राजकारणात भाजपाने (Bjp) प्रदुषण वाढवले असा अप्रत्यक्ष टोला आदित्य ठाकरे यांनी लगवाला आहे.
अहमदनगर : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते आज अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे मुळा साखर कारखान्यात डिस्लेरीचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी विरोधकांना नाव न घेता चिमटे काढले आहेत. पर्यावरण मंत्री म्हणून प्रदूषण (Pollution) कमी करण्यावर आदित्य ठाकरेंचा सध्या भर आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपलाही नाव न घेता चिमटे काढले आहेत. राजकारणात भाजपाने (Bjp) प्रदुषण वाढवले असा अप्रत्यक्ष टोला आदित्य ठाकरे यांनी लगवाला आहे. त्यामुळे यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात संजय राऊतांनी पत्रकार परिषदा घेत रान पेटवलं आहे. तर दुसरीकडून भाजप नेते किरीट सोमय्या राऊत आणि शिवसेनेवर आरोपांची बॅटिंग करत खिंड लढवत आहेत. कोविड काळात ठाकरे सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. आज सोमय्यांनी कोर्लाई गावत दाखल होत राजकारण आणखी तापवलं आहे. भाजप नेत्यांकडूनही राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
राज्यात मोठा पॉलिटिकल राडा
आज आदित्य ठाकरेंनी याच पॉलिटिकल राड्यावरून निशाणा साधत भाजपला टार्गेट केले आहे. राजकारणातलं प्रदूषण वाढलं आहे, ते राजकारणातील हे प्रदूषण संपवणार असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. तसेच राजकारणाची पातळी घसरलीय. दररोज काहीतरी सुरू असतं, त्यामुळे ते थाबवण्याची गरज आहे. असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. आज प्रदुषणमुक्त डिस्लरीचे उद्घाटन केले तसंच राजकारणातील प्रदुषण संपवणार, अशी हाक यावेळी आदित्य ठाकरेंनी दिली आहे. संजय राऊतांची पत्रकार परिषद आणि किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाल्यापासून रोज राज्यात मोठा पॉलिटिकल राडा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना यावरून पुन्हा आमनेसामने आले आहेत.
राणेंचा खळबळजनक दावा
आता या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी देखील उडी घेतली आहे. राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर राणेंनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता राणेंनी शिवसेना खासदार विनायक राऊतांना उद्देशून एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली. त्या प्रकरणाची चौकशी परत होईल, असा दावा नारायण राणेंनी केलाय. ‘खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार?’, असं ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे.
सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील, नाना पटोलेंचा मोदींना इशारा
आदित्य ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल
संजय राऊतांची पत्रकार परिषद नव्हे तर घाम पुसत केलेले भाषण, नितेश राणेंचा पुन्हा घणाघात