Disha Salian Case : ‘आदित्य ठाकरे हे दोन ते तीन तास दिशाच्या…’, सालियान यांच्या वकिलाचा खळबळजनक दावा
Disha Salian Case : 12 जानेवारी 2024 हा या केसमधील महत्त्वाचा पॉइंट आहे. लेखी तक्रार, पुराव्यासह आरोपींची नाव लिहून दिली. आदित्य ठाकरे आरोपी आहे हे लिहून रीतसर तक्रार एसआयटीला दिली. त्यावर एसआयटीने आम्हाला रितसर पत्र दिलं. तुमची तक्रार एसआयटीच्या तपासात घेतली आहे.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात तिचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. पाच वर्षांनी पुन्हा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा हे त्यांच्या मागण्या काय आहेत, या बद्दल टीव्ही 9 मराठीशी बोलले आहेत. “आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्याविरोधात गँगरेप, मर्डर 376 डी, 302, 120 अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. कस्टडी घेण्यात यावी. यांची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी. आरोपीला मृत्यूदंड होईल, हे सुनिश्चित करावं ही आमची प्रमुख मागणी आहे” असं वकील निलेश ओझा म्हणाले.
“आरोपींचा असा दबदबा चालणार नाही. निष्पक्ष कारवाई होऊ शकते त्याठिकाणी ही केस ट्रान्सफर करावी. ही सुद्धा आमची मागणी आहे” असं निलेश ओझा म्हणाले. “याचिकाकर्ते, वकील, साक्षीदार यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं. समीर वानखेडे यांच्याकडे महत्त्वाच डेटा आहे. त्यांच्या सुद्धा पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. NCB काही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. ते सर्व मेन्शन केलं आहे त्या डेटामध्ये” असं निलेश ओझा म्हणाले.
सिक्रेट बाबी समोर आल्या
“आदित्य ठाकरे, डिनो मारियो हे दोन ते तीन तास दिशा सालियानच्या फ्लॅटवर होते. अशा काही सिक्रेट बाबी समोर आल्या आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरेला तात्काळ अटक होऊ शकते, अटक झाली पाहिजे” अशी मागणी वकिल निलेश ओझा यांनी केली. आतापर्यंत त्रयस्थ व्यक्तीकडून आरोप झाले होते. दिशा सालियानच्या आई-वडिलांनी कधीच अशी मागणी केली नव्हती. पण आता याचिका दाखल केलीय, त्यांचा उद्देश काय? पाच वर्ष का गप्प होते?
पाच वर्ष का गप्प होते?
या प्रश्नावर निलेश ओझा म्हणाले की, “चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आरोपीच्या दलाल लोकांनी हा प्रश्न पेरुन ठेवलेला आहे. अडीच वर्ष गुंडाचं राज्य होतं. त्या काळात दुसऱ्याच्या मुलीवर बलात्कार करुन मर्डर करायचे, आवाज उठवणार त्यांना मारहाण करायची. महिलांना हरामखोर बोलायचं. कोणाच घर तोडायचं, अर्णब गोस्वामीला जेलात टाकायचं हे काम चालू होतं. सतीश सालियन यांच्या घरी जाऊन किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणला”
12 जानेवारी 2024 हा या केसमधला महत्त्वाचा दिवस
“या सगळ्या गोष्टी यात आहेत. पोलिस जाऊन त्यांच्याकडे जाऊन सिनेमाची स्क्रिप्ट देतात, असं झालं होतं, हे झालं होतं, तुम्ही कोणाला काही बोलू नका. हे सगळं झाल्यानंतर सांगितलं, केस क्लोज झाली. परंतु जेव्हा यांचं सरकार गेलं. शिंदे साहेबांच सरकार आलं, सप्टेंबर 2023 मध्ये जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. त्यानंतर शिंदे सरकारमध्ये एसआयटीची घोषणा झाली.