Nawab Malik vs Wankhede : वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांचं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, म्हणाले…
मुंबई : वानखेडेप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांनी मुंबई उच्च न्यायालया(Bombay High Court)त खेद व्यक्त केलाय. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. याविषयीचं हमीपत्र त्यांनी न्यायालयात सादर केलंय. तसंच यानंतर वानखेडे यांच्याविषयी कोणतंही व्यक्तिगत विधान करणार नाही, असं म्हटलंय. तीन पानांचं प्रतिज्ञापत्र 3 […]
मुंबई : वानखेडेप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांनी मुंबई उच्च न्यायालया(Bombay High Court)त खेद व्यक्त केलाय. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. याविषयीचं हमीपत्र त्यांनी न्यायालयात सादर केलंय. तसंच यानंतर वानखेडे यांच्याविषयी कोणतंही व्यक्तिगत विधान करणार नाही, असं म्हटलंय.
तीन पानांचं प्रतिज्ञापत्र 3 पानी प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयात सादर केलंय. ज्येष्ठ वकील चिनॉय यांच्यामार्फत हायकोर्टात म्हणणं मांडलं. मी फक्त माझ्या सरकारी सेवक पदाच्या अधिकारात वक्तव्यं केली. कोणाविषयी वैयक्तिक मत व्यक्त केलं नाही. यापूर्वी व्यक्त केलेल्या वक्तव्यांविषयी खेद व्यक्त करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केलेली काही विधानं त्यांनी मुंबई हायकोर्टात दिलेल्या 25 नोव्हेंबरच्या वचननाम्याचे उल्लंघन करत आहेत, असा तक्रार अर्ज वानखडे यांनी खंडपीठाकडे केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणी दरम्यान वानखडे यांच्या दाव्यावर मलिक यांचा जबाब न्यायमूर्ती काथावाला यांनी मागवला होता. त्यानंतर आज शुक्रवारी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात मलिक यांनी सांगितलं, की केलेली विधानं आणि टिप्पण्या हे त्यांच्या किंवा त्यांच्या वतीनं जारी केलेली विधानं नाहीत. ते म्हणाले की पत्रकारांच्या मुलाखतींदरम्यान अनेक विषयांवर विधानं केली गेली.
बिनशर्त माफी बिनशर्त माफी मागतो. यापुढे अशी विधानं करणार नाही, याची हमी देतो, असं प्रतिज्ञापत्रात त्यांनी नमूद केलंय. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली, असा आक्षेप नोंदवणारा अर्ज ज्ञानदेव वानखेडे यांनी केला होता. त्यावर शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठानं याविषयी विचारणा केल्यानंतर मलिकांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं.