मुंबई: महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे, धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. महाराष्ट्रातील जनता अत्यंत सूज्ञ आहे, सावध आहे. संयमी आहे आणि ज्ञानी आहे. देशभरातील हा व्यापक दंगलीचा कट आहे. जे दिल्लीत घडलंय ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. पण तो यशस्वी होणार नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी राज ठाकरे (raj thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. प्रत्यक्ष अयोध्येच्या युद्धभीमवर शिवसेना (shivsena) होती. रणांगणावर आम्ही होतो. आता मंदिर उभं राहतंय. आता प्रसाद मिळतो. काही लोकं प्रसादाला जातात. आम्ही रणागणांवर जातो. कुणाला इच्छा झाली असेल तर नक्कीच जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यावं. अयोध्या सगळ्यांची आहे, असा चिमटाही राऊत यांनी काढला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतल्यानंतर संजय राऊत यांनीही मीडियाशी संवाद साधून राज यांना टोले लगावले.
बाळासाहेबांच्या नेतृत्वात शिवसेना अयोध्येच्या रणभूमीत काम करत होती. शिवसेनेची यात्रा म्हणजे राजकीय यात्रा नव्हती. आमचा दौरा हा श्रद्धेचा दौरा आहे. कोव्हीड काळात आम्ही जाऊ शकलो नाही. त्यामुळे आम्ही आता जात आहोत. प्रभु श्री राम सर्वांचे आहेत. त्यामुळे कोणीही अयोध्येला गेल्यास हरकत नाही. सर्वांनीच जायला पाहिजे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबाबत परिस्थिती पाहून तारीख ठरवू, असं राऊत म्हणाले.
भाजपनं ओवेसी चा वापर जसा केला तसाच वापर आता नव हिंदू ओवैसींचा सुरू आहे. भाजप या नव हिंदू ओवैसींच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहेत. महाराष्ट्रात नवे ओवैसी निर्माण होत आहे. उत्तर प्रदेशातही भाजपने असेच ओवैसी तयार करून विजय प्राप्त केला. तेच आता महाराष्ट्रात घडत आहे, असा दावाही त्यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी येत्या 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. अयोध्येला जाणार असल्याची तारीख जाहीर करण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच तुम्हीही अयोध्येला दर्शनासाठी या असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी त्यांनी 1 मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा घेणार असल्याचंही जाहीर केलं.
संबंधित बातम्या:
Amol Mitkari | राज ठाकरे दंगली भडकवण्याचे काम करतात, आमदार अमोल मिटकरी यांची टीका