ग्रामपंचायतीत घवघवीत यश, ठाकरे गटावर मात केल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Grampanchayat Election Result | ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालय. 2359 ग्रामपंचायतींपैकी भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची मोठी पिछेहाट झालीय. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ग्रामपंचायतीत घवघवीत यश, ठाकरे गटावर मात केल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
CM Eknath Shind-Uddhav thackeray
Follow us
| Updated on: Nov 06, 2023 | 4:21 PM

मुंबई : “ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिलाय. मी मतदारांचे आभार मानतो. महाविकास आघाडीने जी काम थांबवलेली, प्रकल्प रोखलेले त्याला आम्ही चालना देण्याच काम केलं. राज्याच्या सर्वांगीण विकासाच धोरण आम्ही आखलं. या राज्यातील सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्यापासून उद्योजकापर्यंत तरुण, ज्येष्ठ नागरिक, भगिनी या सगळ्यांना न्याय देण्याच काम आमच्या सरकारने केलं” अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामपंचायत निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. यात शिंदे गटाने बऱ्यापैकी यश मिळवलय. ठाकरे गटावर मात केलीय. “शासन आपल्या दारी खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलय. कृतीतून मतदारांनी हे दाखवून दिलं. आपलं प्रेम व्यक्त केलं. महाविकास आघीडापेक्षा कितीतरी पटीने अधिक सरपंच, सदस्य महायुतीचे निवडून आले. म्हणून मी मनापासून राज्यातील जनतेचे आभार मानतो” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आपपल्यापरीने लोकाभिमुख काम करण्याचा, जनतेला न्याय देण्याच काम आम्ही केलं” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “काहींनी फक्त आरोप, प्रत्यारोप आणि टोमणे यामध्ये वर्ष घालवलं. वर्षातला एकही दिवस टिका, टिप्पणी करण्याची संधी सोडली नाही. लोकांनी त्यांना नाकारलं” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांचा रोख संजय राऊत यांच्याकडे होता. जे रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधत असतात.

‘त्यांना घरी बसायची सवय होतीच’

“ज्या लोकांनी मतदारांशी प्रतारणा केली, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. त्यांना जनतेने घरी बसवलं, त्यांना घरी बसायची सवय होतीच” असा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोमणा मारला. “आमच्यावर मतदारांच प्रेम आहे, मतदारांचे विश्वास आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. आणखी काम करुन विकास करु. उद्योगधंदे आणून तरुणांना स्वत:च्या पायावर उभं करु. विकासाला आणखी चालना देऊ” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “आधीच्या अडीच वर्षातील कामगिरी लोकांनी पाहिली, घरी बसून राज्य चालवता येत नाही हे लोकांनी दाखवून दिलं” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.