हरियाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजप खेळणार मास्टरस्ट्रोक? महिलांच्या खात्यात येणार…

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पुढच्या महिन्यात होणार आहेत. त्याआधी सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे, त्यामुळे मतदारांचा कौल कोणाच्या बाजुने असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हरियाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजप खेळणार मास्टरस्ट्रोक? महिलांच्या खात्यात येणार...
Follow us
| Updated on: Oct 10, 2024 | 6:58 PM

हरियाणात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 90 जागांच्या विधानसभेत भाजपला 48 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 37 जागा मिळाल्या. भाजपला हरियाणात पराभवाचा सामना करावा लागेल असं सर्वच एक्झिट पोलने म्हटलं होतं. पण तसं झालं नाही. उलट भाजपने तिसऱ्यांदा सत्तेत येत इतिहास रचला आहे. कारण पहिल्यांदाच कोणता पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत आला आहे.

भाजपच्या विजयामागे त्यांनी दिलेलं आश्वासन असल्याचं म्हटलं जात आहे. कारण निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने हरियाणात महिलांना दरमहा २१०० रुपये आणि शाळकरी मुलींना स्कूटर देण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय MSP वर 24 पिके खरेदी करणे, प्रत्येक अग्निवीराला सरकारी नोकरी देणे, जीवन आयुष्मान योजनेंतर्गत 10 लाखांचा आरोग्य विमा, तरुणांना 2 लाख नोकऱ्या आणि घर गृहिणी योजनेंतर्गत 500 रुपयांना LPG सिलिंडर देणे अशी अनेक आश्वासनं दिला होती. ही सर्व निवडणूक आश्वासने पूर्ण केल्यास राज्याची वित्तीय तूट २ टक्क्यांनी वाढेल. असा अंदाज आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने अशी कोणतेही आश्वासने दिली नव्हती. याउलट काँग्रेसने अनेक आश्वासन दिल्याने त्यांचा फायदा झाला असेही बोलले जात आहे. काँग्रेसच्या अशा आश्वासनांचा मुकाबला करण्यासाठी भाजपने देखील हरियाणात वेगवेगळी आश्वासने दिली. या मोफत आश्वसनांमुळे भाजपला कोणत्याही परिस्थितीत मागे राहायचे नव्हते, म्हणून त्यांनी अशी आश्वासनेही दिली.

2023 मध्ये कर्नाटकातील भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत त्यांनी धडा घेत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोठी आश्वासन दिले. विधानसभा निवडणुकीत याचा भाजपला फायदा झाला. त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपने सरकार स्थापन केले.

ओडिसात पहिल्यांदा आलं सरकार

ओडिशा विधानसभा निवडणुकीत ही भाजपने अशीच अनेक आश्वासने दिली होती. त्यानंतर ओडिसात पहिल्यांदा भाजपचं सरकार स्थापन झालं. लोकसभा निवडणुकीत भाजपने राष्ट्रीय स्तरावर असे कोणतेही मोठे आश्वासन दिले नव्हते. पण काँग्रेसने महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. राहुल गांधी म्हणाले होते की, पैसा लवकरच येईल, पण भाजपने १० वर्षे सरकार असतानाही असे कोणतेही आश्वासन देण्याचे टाळले होते. भाजपच्या जागा कमी झाल्या आणि आता तिसऱ्या टर्ममध्ये सरकार चालवण्यासाठी मित्रपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला. काँग्रेसने काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याबाबत आश्वासन दिले होते. आता मोदी सरकारने UPS (युनिफाइड पेन्शन योजना) जाहीर केली आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडकडे नजर

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या पाठिंब्यावर चालणारे शिंदे सरकार लाडकी बहिन योजना राबवत आहे, ज्यामध्ये महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. झारखंडमध्येही भाजपने सत्तेत आल्यास गोगो दीदी योजनेंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आश्वासन दिले आहे की जर राज्यात पुन्हा त्यांचं सरकार आलं तर ते लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांना देखील २१ रुपये मिळण्याची शक्यता आहे.

उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा.
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन.
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी.
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी.
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?.
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....