Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sperm Donor | ‘स्पर्म बँक’ बुडण्याची भीती? महामारीनंतर ‘विकी’ डोनर्स गेले कुठे?

कोरोना महामारी आणि लॉकडाऊन या दोन्ही गोष्टींनी सगळ्यांच क्षेत्रांचं प्रचंड मोठं नुकसान केलं. एकही क्षेत्र यातून सुटलेलं नाही. अशाच अनेक क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचं क्षेत्र आहे, फर्टिलिटी! फारशी ज्याची उघडउघड चर्चा होत नाही, त्या फर्टिलिटी क्षेत्राचं थेट नातं जोडलं गेलंय ते स्पर्म बँकेशी! शुद्ध भाषेत सांगायचं तर वीर्य बँका.

Sperm Donor | 'स्पर्म बँक' बुडण्याची भीती? महामारीनंतर 'विकी' डोनर्स गेले कुठे?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 2:44 PM

दान (Donate) करण्याचा आनंद काही औरच आहे. मग ते पैसे असोत किंवा स्पर्म (Sperm)! स्पर्म डोनेट करण्याचं महत्त्वाचं सांगणारी एक सुंदर फिल्म शूजीत सिरकारनं (Shoojit Sircar) बनवली होती. नाव होतं, विकी डोनर (Vicky Donor)! गायकोलॉजिस्टचा रोल करणाऱ्या अन्नू कपूरनं (Annu Kapoor) केलेल्या अभिनयानं विकी डोनर सिनेमाला चारचांद लावले. डोनर किती महत्त्वाचा असतो, हे आयुषमान खुरानानं (Ayushmann Khurrana) वठवलेल्या विकीनं आपल्याला सिनेमातून (Cinema) सांगितलं! पण विकीसोबत डॉ. चढ्ढाही महत्त्वाचा असतो आणि तो चालवत असलेली स्पर्म बँकची फर्म ही तर त्याहीपेक्षा महत्त्वाची असते, हे मात्र आपलं आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. कारण कोरोनानंतर आपल्या समाजातले ‘विकी डोनर’ एकीकडे घटले आहेत. तर दुसरीकडे असलेल्या डोनरची स्पर्म क्वालिटीही (Quality) खालावली आहे.

Photo Source – Google

कोरोना महामारी आणि लॉकडाऊन या दोन्ही गोष्टींनी सगळ्याच क्षेत्रांचं प्रचंड मोठं नुकसान केलं. एकही क्षेत्र यातून सुटलेलं नाही. अशाच अनेक क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचं क्षेत्र आहे, फर्टिलिटी! फारशी ज्याची उघडउघड चर्चा होत नाही, त्या फर्टिलिटी क्षेत्राचं थेट नातं जोडलं गेलंय, ते स्पर्म बँकेशी! शुद्ध भाषेत सांगायचं तर वीर्य बँका. या वीर्य बँकांच्या सोबत एक महत्त्वाची गोष्ट काम करत असते जिला म्हणतात फर्टिलिटी सेंटर. या दोन्ही गोष्टींना कोरोनाच्या महामारीनं इतकं अडचणीत आलंय, की वीर्यदान म्हणजेच स्पर्म डोनेट करणाऱ्यांची संख्याही घटली आहे. तर दुसरीकडे फर्टिलिटी सेंटरही अखेरच्या घटका मोजत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.

काय आहे आकडेवारी?

भारतात आव्हीएफ तंत्रज्ञानानंतर (IVF Technology) वेगवेगळ्या ठिकाणी फर्टिलिटी सेंटर (Fertility Centre) उभारले गेले. त्यांची संख्याही वाढत जाते आहे. देशभरात सुमारे 1700 ते 1800पेक्षा जास्त फर्टिलिटी सेंटर आहेत. त्यात एकट्या महाराष्ट्रात 300 ते 350 सेंटर असण्याची शक्यता आहे. पुण्यात (Pune) 35 ते 40, औरंगाबादेत (Aurangabad) 18, तर मुंबईतही (Mumbai) तब्बल 70 ते 80 फर्टिलिटी सेंटर असण्याचा अंदाज वर्तवला जातोय. मात्र जाणकारांनी व्यक्त केलेल्या भीतीमुळे आता स्पर्म बँका आणि फर्टिलिटी सेंटर शेवटच्या घटका मोजत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. महामारीत गायब झालेले स्पर्म डोनर पुन्हा परतले नसल्याची माहिती समोर आली असून जे स्पर्म डोनर परतले, त्यांचा स्पर्म काऊंट कमी झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

औरंगाबादच्या स्पर्म बँक संचालिक गीता आचार्य यांनी एक वृत्तपत्राशी बोलताना म्हटलंय की,…

लॉकडाऊनमध्ये निघून गेलेले स्पर्म डोनर परतले नसून जे परतले त्यांच्यातील स्पर्म काऊंट कमी झाला आहे. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करणं कठीण झालंय. कोरोना काळात स्पर्म काऊंट कमी का झाला, यावर संशोधन सुरु असून सध्या स्पर्म बँका अडचणीत आलेल्या आहेत.

म्हणून फर्टिलिटी सेंटर महत्त्वाचे!

एकेकाळी बाळ होत नाही, याचा दोष फक्त आणि फक्त स्त्रीलाच दिला जात होता. पण जसजसं विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्र प्रगती करत गेलं, तसंतशी अनेक महत्त्वाची संशोधनं समोर आली. अखेर समाजही पुरुषाच्या दोषांबाबत अधिक उघडपणे बोलू लागला. यातूनच मग ज्यांना मूल होत नाही, त्यांच्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी (Test Tube Baby), सरोगसी किंवा मूल दत्तक घेणं असे पर्याय खुले झाले. मात्र गेल्या काही वर्षात अनेक कुटुंबात जिथं मूल होणं शक्य नसतं, त्यांच्यासाठी फर्टिलिटी सेंटर महत्त्वाचा आधार म्हणून काम करत होते. अशातच कोविड महामारीत या फर्टिलिटी सेंटरलाही मोठा फटका बसला असून स्पर्म डोनरही गायब झालेत. शिवाय जिथं स्पर्म डोनर मिळत आहेत, तिथला स्पर्म काऊंट कमी झालाय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. इतकंच काय तर खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी, औषधांचा अतिवापर यामुळेही वीर्याचा दर्जादेखील खालावला असल्याचं सांगितलं जातंय.

नवे ‘विकी डोनर’ कुठून आणणार?

कोरोनाच्या काळानंतर अनेक दाम्पत्य मूल होऊ देण्याबाबतच्या गोष्टीकडे अधिक गांभीर्यानं पाहू लागली आहेत. मूल होऊ देणं ही आनंददायी गोष्ट तर आहेच. पण अनेकदा लग्न उशिरा झाल्यानं किंवा वय निघून गेल्यानं अनेकांना मूल होणं, हे अडचणीचं आणि गुंतागुंतीचं बनून जातं. अशावेळी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फर्टिलिटी सेंटर आणि वीर्य बँका यांना पुन्हा कसं सक्षम बनवायचं, हा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय. त्यासाठी नवे ‘विकी डोनर’ कुठून आणायचे, असं एक वेगळं आव्हानंही संपूर्ण व्यवस्थेसमोर असणार आहे!

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.