Manoj jarange patil | ‘ए आजच्या चांगल्यादिवशी त्याच नाव सुद्धा घ्यायच नाही हट’, नाव ऐकताच मनोज जरांगे खवळले

Manoj jarange patil | मी अपमान सहन केला, आज आरक्षण खेचून आणलं का नाही? सगेसोयरे शब्दाचा समावेश झाला. हे सोप नव्हतं. मुंबईत गुलाल उधळणार बोललेलो, त करुन दाखवलं" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj jarange patil | 'ए आजच्या चांगल्यादिवशी त्याच नाव सुद्धा घ्यायच नाही हट', नाव ऐकताच मनोज जरांगे खवळले
Manoj jarange patil
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 12:15 PM

Manoj jarange patil | “राजपत्र घेतलं. मराठा समाजाला मिळवून दिलं. हा सगळा विजय मराठा समाजाचा आहे. माझ्या भावांच स्वप्न पूर्ण झालं. आरक्षणासाठी खूप संघर्ष केला. मराठा समाज खूप लढला. बलिदान दिलेल्या भावांच स्वप्न आज पूर्ण झालय. कुटुंब उघडण्यावर पडलं, आई-बहिणीच्या कंपाळाच कुकुं गेलं. हे सोप नव्हतं. आरक्षणासाठी 250 ते 300 पोरांनी बलिदान दिलयच. आज त्यांच स्वप्न साकार झालं. सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “कायदा पारित होणार नाही, असं म्हणायचे काही लोक, आमच्यातले पाच-पन्नास लोक जळणारे होते, आता कायदा आणला का नाय खेचून” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तुम्ही दोन उपोषण केली. दुसर उपोषण अन्न-पाण्याशिवया केलं, त्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांना विचारलं, ते म्हणाले की, “इथून पुढेही मराठा समाजासाठी आमरण उपोषण करीन, मी प्राण द्यायलाही तयार आहे. सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ नाही बसणार हा पठ्ठ्या शेवटपर्यंत लढणार” मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सर्व चॅनल, वर्तमानपत्र, कॅमेरामन्सचे आंदोलनाच्या लढयात साथ दिल्याबद्दल मनापासून आभार मानले.

‘मी अपमान सहन केला’

“आरक्षण मिळणार नाही, कायदा मंजूर होणार नाही असं काही लोक म्हणायचे. मी अपमान सहन केला, आज आरक्षण खेचून आणलं का नाही?सगेसोयरे शब्दाचा समावेश झाला. हे सोप नव्हतं. मुंबईत गुलाल उधळणार बोललेलो, त करुन दाखवलं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करायचे, त्या संबंधी विचारलेल्या प्रश्नावर मनोज जरांगे लगेच म्हणाले, ‘ए आजच्या चांगल्यादिवशी त्याच नाव सुद्धा घ्यायच नाही हट’

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.