Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Violence Update : नागपूरच्या कुठल्या भागात संचारबंदी? किती जणांना ताब्यात घेतलय? जाणून घ्या

Nagpur Violence Update : नागपूर शहरात काल रात्री मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन वातावरण तापलं आहे. आज नागपूरच्या कुठल्या भागात संचारबंदी आहे? किती जणांना ताब्यात घेतलय? त्या बद्दल जाणून घ्या.

Nagpur Violence Update :  नागपूरच्या कुठल्या भागात संचारबंदी? किती जणांना ताब्यात घेतलय? जाणून घ्या
Nagpur Violence UpdateImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2025 | 8:48 AM

नागपूर शहरात आज तणावपूर्ण शांतता आहे. नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. वाहनांना आगी लावल्या. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला आहे. त्यावरुन हा सर्व राडा झाला. काल विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावर आंदोलन केलं. नागपूरच्या महाल भागात अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दगडफेक करणाऱ्यांना रोखताना पोलीसही जखमी झाले. दगडफेकीच्या घटनेत 8 ते 10 पोलीस जखमी झाले. आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे चार जवानही जखमी झाले. जमावाने तिथे असलेला जेसीबी पेटवून दिला.

आता महाल भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचवेळी संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शांतता बाळगण्याच आवाहन केलं आहे. “नागपूर शहर हे एकोप्याने रहाणार शहर आहे. त्यामुळे कोणीही शांतता भंग करु नये. मी स्वत: परिस्थितीवर पूर्ण नजर ठेऊन आहे” असं मुख्यमंत्री म्हणाले. “मी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलय, जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल ते अत्यंत गांर्भाीयने घेतलं जाईल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कलम 144 लागू

नागपूरमध्ये पोलिसांनी कलम 144 लागू केलं आहे. पाचपेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी आहे. नागपूरच्या संवेदनशील भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नागपूरच्या कुठल्या भागात संचारबंदी आहे ते जाणून घ्या

कोतवाली

गणेशपेठ

तहसील

लकडगंज

पाचपावली

शांतीनगर

सककरदरा

नंदनवदन

इमामवाडा

यशोधरानगर

कपीलनगर

'आता टोकाला जाईपर्यंत संघर्ष', हिंदी सक्तीविरोधात मनसेचा आरपारचा इशारा
'आता टोकाला जाईपर्यंत संघर्ष', हिंदी सक्तीविरोधात मनसेचा आरपारचा इशारा.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.