Pankaja Munde | ‘आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर….’ बहिणीने ओवाळलं, धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट

Pankaja Munde | बहिण-भावाच्या नात्यातील मायेचा ओलावा पुन्हा एकदा दिसून आला. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण-भावाच्या नात्यातील एक भावनिक क्षण पुन्हा एकदा महाराष्ट्राने पाहिला.

Pankaja Munde | 'आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर....'  बहिणीने ओवाळलं,  धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
dhananjay munde-Pankaja MundeImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 11:33 AM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय भूकंपाचा काळ सुरु आहे. सत्ता, राजकीय महत्वकांक्षेपोटी सख्खी, रक्ताची नाती परस्पररापासून दुरावत चालली आहेत. त्याचवेळी राजकारणामुळे दुरावलेलं एक नातं जवळ येत असल्याच दिसत आहे. बहिण-भावाच्या नात्यातील मायेचा ओलावा पुन्हा एकदा दिसून आला. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण-भावाच्या नात्यातील एक भावनिक क्षण पुन्हा एकदा महाराष्ट्राने पाहिला.

काही वर्षांपूर्वी धनजंय मुंडे यांनी दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पंकजा आणि धनंजय मुंडे परस्परांचे राजकीय विरोधक बनले.

राजकीय बंडामुळे समीकरण बदललं

राजकारणामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना परस्पराविरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी लागली. आता राज्यातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलल आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं. अजित पवार यांच्याबरोबर धनंजय मुंडे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

पंकजा मुंडे निवडणूक कुठून लढवणार?

त्यामुळे बहिण-भाऊ दोघे एकाच सरकारमध्ये आले. पण विधानसभेचा मतदारसंघ एकच असल्याने पंकजा मुंडे विधानसभेची निवडणूक कुठून लढवणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुडे आणि धनंजय मुंडे पुन्हा एकदा एकत्र दिसले. राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती झाल्यामुळे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं व शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांच्या नात्यांमधील एक मायेचा ओलावा दिसून आला. सध्या पंकजा मुंडे या वेगळी राजकीय भूमिका घेणार अशी चर्चा आहे. त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याचं राजकीय वर्तुळात बोलल जातय. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद बोलवली आहे. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.