AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचीही घोषणा, अयोध्येला जाणार!

राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचीही घोषणा, अयोध्येला जाणार!
Devendra Fadnavis_Raj Thackeray
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 4:15 PM

अहमदनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या (Raj Thackeray Ayodhya) दौरा करणार आहेत. येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Ayodhya) यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. (After Raj Thackeray announcement Devendra Fadnavis will also go to Ayodhya)

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे कृषी विधेयकाविरोधात उपोषण करण्याच्या तयारीत आहे. मात्र अण्णांच्या मनधरणीसाठी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राळेगणसिद्धीला गेले आहेत. यावेळी केंद्रीय कृषीराज्यमंत्री कैलास चौधरी हे सुद्धा उपस्थित आहेत. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी विविध प्रश्न विचारले.

राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अण्णांशी गेल्या आठवड्यापासून आमची चर्चा सुरु आहे. आजच्या बैठकीत काही मार्ग निघेल असं आम्हाला वाटतंय. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींवर निर्णय देखील घेण्यात आले आहेत. त्यांनी उपोषणाला बसावं असं कोणालाच वाटत नाही”.

लोकल सेवेवर भाष्य

लोकल सेवा टप्याटप्याने सुरु केली पाहिजे. विशेषत: खासगी क्षेत्रातील नोकरवर्गाला ही सेवा नसल्याने खूप त्रास होतो आहे. त्यामुळे त्याच्या टायमिंग संदर्भात विचार केला पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे.

(After Raj Thackeray announcement Devendra Fadnavis will also go to Ayodhya)

संबंधित बातम्या  

मनसेचा मेगाप्लॅन, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा ठरला, निवडणुकीसाठी रणनीती आखली

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...