समनापूर, कोल्हापूरनंतर आता इचलकरंजीत तणाव, कोल्हापूर प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, इंटरनेट बंदच

Hindutva organizations in Kolhapur : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. आधी अहमदनगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या तणावानंतर कोल्हापूर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून कोल्हापुरात तणाव आहे.

समनापूर, कोल्हापूरनंतर आता इचलकरंजीत तणाव, कोल्हापूर प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, इंटरनेट बंदच
Kolhapur police
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 11:49 AM

भूषण पाटील, कोल्हापूर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात मंगळवारी दोन गटात वाद झाला. संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यानंतर घरी परतत असताना संगमनेर तालुक्यापासून 5 ते 6 किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आला. यामुळे बुधवारी कोल्हापुरात तणाव होता. आता गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत तणाव निर्माण झाला आहे.

कशामुळे इचलकरंजीत तणाव, दोन जण ताब्यात

इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या खोतवाडी गावातील मतदार गल्लीमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी आपल्या मोबाईलवर औरंगजेब अन् टिपू सुलतानचे आक्षेपार्य स्टेटस ठेवले होते. ही माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळतात त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांना चांगला चोप दिला. दरम्यान, शहापूर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गावमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कोणता अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे. तसेच खोतवाडी गावामध्ये चौका चौकामध्ये पोलीस तैनात आहे.

हे सुद्धा वाचा

इचलकरंजी येथील कबनूर गावातील हनुमान मंदिराशेजारी अज्ञात व्यक्तीने मजकूर लिहिल्याने तणाव निर्माण जाला आहे. तर कोल्हापूरच्या खोतवाडी गावातही स्टेट्सवरून तणाव निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

कोल्हापुरात 36 जणांना अटक

कोल्हापूर शहरातील तणावासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये 300-400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात बेकायदेशीर जमाव जमावणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, दगडफेक करुन नुकसान करणे, पोलिसांच्या आदेशाचं पालन न करणं या आरोपांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 36 जणांना अटक केली आहे तसेच 3 अल्पवयीन मुलांना बालसुधार गृहात पाठवलं आहे. स्टेटस ठेवल्याप्रकरणी 5 अल्पवयीन मुलांना बाल सुधार गृहात पाठवलं असल्याचे पंडीत यांनी सांगितले.

इंटरनेट सेवा रात्री 12 पर्यंत बंद राहणार

कोल्हापुरातील इंटरनेट सेवा रात्री 12 पर्यंत बंद राहणार आहे. शहरात 4 SRPF, 300 पोलीस, 60 अधिकारी बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहेत. सध्या जिल्ह्यात शांतता आहे. गरज पडली तर आणखी फोर्स मागवणार असल्याचे पोलीस अधीक्षक पंडीत यांनी सांगितले. सीसीटीव्ही तपासून पुढील कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाडळी गावात तणाव

कोल्हापूर वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील एका तरुणाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याचा प्रकार बुधवारीसमोर आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. वरणगे पाडळीतील एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलवर औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्याचे हिंदुत्ववादी संघटनांच्या निदर्शनास आहे. सुमारे 700 ते 800 च्या जमावाने संबंधित तरुणाच्या घरावर चाल करून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक रात्री उशिरा गावात दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.