Maratha Reservation | जरांगे पाटील यांनी स्टेजवरुन मुख्यमंत्र्यांना एकच विनंती केली, की…. Video
Maratha Reservation | मराठा आरक्षण आंदोलनाच्या विजयानंतर मराठा समाजाची नवी मुंबईत एक भव्य सभा होत आहे. या सभेला मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाकडून गिरीश महाजन उपस्थित आहेत. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? याची उत्सुक्ता आहे.
Maratha Reservation | मराठा आरक्षण आंदोलनाच्या लढ्याला मोठ यश मिळालं आहे. महाराष्ट्र सरकारने आज पहाटे या आंदोलनचा मुख्य चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. विशेष अध्यादेश काढून सगेसोयरे या शब्दाचा समावेश केला. कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्याव ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी होती. ती मान्य केली होती. पण सगेसोयरे शब्दाचा समावेश होत नसल्यामुळे लाखो मराठे आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहत होते. आता या शब्दाचा समावेश झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा हा मोठा विजय असून आज नवी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठ्यांची भव्य सभा होत आहे. या सभेला मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाकडून गिरीश महाजन उपस्थित आहेत.
मनोज जरांगे पाटील काय बोलणार?
– 54 लाख मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात त्याच वाटप करण्यात याव. ज्यांच्या नोदी सापडल्या त्यांच्या परिवारातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी. सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या ही तिसरी मागणी होती.
– माझ्या मायबाप मराठ्यांनी आरक्षणासाठी संघर्ष केलाय. 300 पेक्षा जास्त मराठ्यांनी आरक्षणासाठी बलिदान दिलय. त्यांच स्वप्न साकार करण्याची जबाबदारी मराठ्यांवर होती. आपण काल मुख्यमंत्री साहेबांनी नोंदी मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी समिती स्थापन केली. नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावे म्हणजे त्यांना तातडीने आरक्षण देता येईल. नोंद मिळालेल्या सग्या सोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार.
– मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढला, यासाठी तुमच मनापासून अभिनंदन. खूप संघर्ष केला. काहींना अन्न पाणी मिळालं नाही, रस्त्यावर झोपले पण त्यांनी तक्रार माझ्यापर्यंत येऊ दिली नाही. साहेब, माझी मराठा समाजच्या वतीने एकच विनंती आहे, ज्या सग्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढलाय. ज्याची कुणबी नोंद मिळाली, जिवाची बाजी लावली म्हणून शरीर सुद्धा साथ देत नाही. मराठा समाजासाठी राजपत्र निघालय ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोत्रातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या. फक्त या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, एवढीच शिंदे साहेंब तुम्हाला विनंती आहे.
– शिंदे समितीला वर्षभर काम करु द्या. गोरगरीब मराठ्यांच चांगलं होईल. मराठवाड्याच 1884 गॅजेट आहे, ते शिंदे समितीकडे द्यावं. ते लागू करावत. आमचा फायदा होईल. कारण मराठवाड्यात खूप कमी कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मला माझ्या जातीचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. माझी जात एका शब्दानेही पुढे जात नाही, हा मला गर्व आहे.
– आरक्षणाल मारलेले खुट्टे उपटून फेकणार म्हणजे फेकणार बोललेलो. मराठ्यांच्या नादी लागायच नाही. तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला, तर आमचा नाईलाज आहे. आम्ही गावखेड्यात मराठा आणि ओबीसीमध्ये वाद होऊ दिला नाही. छोटा-मोठा भाऊ म्हणून गुण्यागोविंदाने राहतो. नेते आमच्यात लावतात भांडण. लग्नाला ओबीसी आणि मराठा बांधव चालले असतील, तर गाडीत 50-50 रुपयाच पेट्रोल टाकतात. ओबीसी आणि मराठा समाजातील गावखेड्यातील प्रेमाच उदहारण जरांगे पाटील यांनी दिलं
– अध्यादेश टिकवून ठेवण्याची, लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आहे. हा गुलाल अध्यादेशचा आहे, त्याचा सन्मान राहू दे. हा विजय महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा आहे.
– अध्यादेशाला काही धोका झाला, तर आझाद मैदानात मी लगेच आलो म्हणून समजा. आरक्षणात कधी अडचण झाली, तर सोडवायला मी पुढे असणार.