राणे आणि राऊत यांचा गुन्हा वेगवेगळा, राणे यांच्यावर मीच गुन्हा दाखल केलाय म्हणत बडगूजर यांनी कुणाला सुनावलं ?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगूजर यांनी हल्लाबोल करत योगेश बेलदार यांना प्रत्युत्तर दिले आहे.
चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात कलम 500 नुसार दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ( Sudhakar Badgujar ) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करत नारायण राणे यांच्या गुन्ह्याची आठवण करून दिली आहे.
ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले, नारायण राणे यांचा गुन्हा वेगळा होता आणि संजय राऊत यांनी जे विधान केले ते प्रकरण मात्र वेगळा आहे. राजकारणात असं विधान करायला नको पण संजय राऊत जे बोलले त्यामध्ये चूक काहीच नाही.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे. तो गुन्हा अदखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. राजकारणात लाचारी सुरू असल्याचा टोलाही यावेळेला संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
योगेश बेलदार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलत असतांना संजय राऊत यांच्यावर आम्ही न बोलण्याचा निर्णय घेतला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्यावर केलेली टीका सहन करणार नाही असे म्हंटले होते.
याशिवाय बेलदार यांनी संजय राऊत यांना नाशिकमध्ये फिरू देणार नाही. त्यांनी माफी मागणी असा इशारा दिला होता त्यावर बडगूजर यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांना अशा अनेक धमक्या आल्या आहेत आम्ही घाबरत नाही असे बडगूजर यांनी पलटवार केला आहे.
ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगूजर यांनी यावेळेला टीका करत असतांना नारायण राणे यांच्या गुन्ह्याची आठवण काढली आहे. मीच तो गुन्हा दाखल केला होता असेही बडगूजर यांनी म्हणत दोन्ही प्रकरणे वेगळे असल्याचा दावा केला आहे.
नाशिकमधील शिंदे गट आणि ठाकरे गट संजय राऊत यांच्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. याशिवाय शिंदे गट संजय राऊत यांच्यावर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करत असतांना दुसऱ्या बाजूने बडगूजर हे पलटवार करत आहे.