बाळासाहेब यांच्या निधनानंतर दिल्लीत काय षड्यंत्र सुरु होतं? उद्धव ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट
बघा! ती किती हरामी लोकं आहेत. त्यांना वाटतं बाळासाहेब गेले. पण, आजही बाळासाहेब आपल्या मनात आहे. 2014 मध्ये दिल्लीत असा विचार सुरू होता. 2014 साली शिवसेनेला खतम करणारी ही लोकं. काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता?

नाशिक | 23 जानेवारी 2024 : शिवसेना ( ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले असे हे जे काही मिंधे बोलत आहेत. ते खुर्चीसाठी शेपूट हलवत बसतोय. अरे मिंध्या, तुझ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करत आहे. हे बाळासाहेबांचे विचार. हे बाळासाहेबांचं हिंदुत्व असा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
2013 साली हेच गृहस्थ उभे होते बिल्ला घालून. जे पक्षप्रमुखच नाही म्हणत होते तेच दाढी खाजवत पाया पडले होते. तुमचे आशीर्वाद ही शिवसेनेची घटना आहे. तुमच्याकडे शंकराचार्यांना मान नाही. मित्रांना मान नाही. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले असं म्हणत असतील तर 2014 साली शिवसेनेशी युती का तोडली होती असा सवाल त्यांनी भाजपला केला.
एकनाथ खडसे नाशिकमध्येच सांगितलं. 2014 मे पर्यंत यांचे ‘गले लग जा.’ सुरु होतं. राष्ट्रपतींच्या पत्रावर सही करायला मला दिल्लीत बोलावलं. तोपर्यंत शिवसेना हिंदुत्ववादी होती. नंतर, जुन ते ऑक्टोबर असं काय घडलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडली. आजही ती व्यक्ती जिवंत आहे. भाजपमधील ती जबाबदार व्यक्ती आहे असे ते उद्धव ठाकरे म्हणाले.
2014 मध्ये भाजपने युती तोडली. शिवसेनेने कुणाच्याही मदतीशिवाय ६३ आमदार निवडून आले. हेच दाढीवाले बुवा विरोधी पक्षनेते होते. तेव्हा ती व्यक्ती आली आणि म्हणाली, उद्धव मला तुझं अभिनंदन करायचं आहे. म्हटलं का. तर म्हणाले, दिल्लीत अशी चर्चा होती. आता बाळासाहेब राहिले नाही. उद्धव ठाकरे काही करू शकत नाही. शिवसैनिक उद्धवसोबत जाणार नाहीत. आता वेळ आलीय शिवसेनेला संपवायचा. शिवसेनेचे 5 किंवा 10 सीट येतील. पण तू कमाल केली. तू 63 जागा आणल्या. दिल्ली आता तुला घाबरतेय, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
बघा! ती किती हरामी लोकं आहेत. त्यांना वाटतं बाळासाहेब गेले. पण, आजही बाळासाहेब आपल्या मनात आहे. 2014 मध्ये दिल्लीत असा विचार सुरू होता. 2014 साली शिवसेनेला खतम करणारी ही लोकं. काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता? असा सवाल त्यांनी भाजपला केला.