HMPV नंतर बर्ड फ्लूचे संकट, नागपुरात तीन वाघ अन् बिबट्याचा मृत्यूनंतर प्रशासन हादरले, चिकन बंद, अमेरिकेत एका व्यक्तीचा मृत्यू
नागपुरात चिकनमुळे प्राण्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाल्यावर चंद्रपूर येथून पथक नागपूर प्राणी संग्रहालयात दाखल झाले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राण्यांना खाद्य देण्यापूर्वी त्यांच्या आहराची तपासणी करण्याची सांगितले. तसेच प्राणी संग्रहालय तात्पुरते बंद ठेवण्याचे निर्देश दिले.
नागपूरमधील प्राणीसंग्राहालयात तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व प्राण्यांना आहारात चिकन दिले जात होते. वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी चिकन खाल्यानंतर प्राण्यांना संक्रमण झाल्याचे म्हटले आहे. परंतु अजून चाचणी अहवाल मिळाले नाही. दुसरीकडे अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे अमेरिकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अमेरिकेत मृत्यू झालेल्या व्यक्ती 65 वर्षीय आहे. त्यांनी त्यांच्या घरात अनेक प्राणी पाळले होते. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना H5N1 झाला.
प्रशासन हादरले, चिकन बंद
नागपूर महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील ‘ली’ वाघिन आणि नर वाघ यांच्या आहारात देण्यात येणारे चिकन बंद करण्यात आहे. बर्डफ्लूच्या दहशतीमुळे प्राणीसंग्रहालयातील वाघांच्या आहातील चिकन पूर्णपणे बंद केले आहे. वाघांसोबतंच बिबट्यांनाही चिकनचा आहार पूर्णपणे बंद केला आहे. नागपूरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्यांचा मृत्यू झाला होता.
चिकन ऐवजी म्हशीचे बिफ
बर्डफ्लूमुळे वाघांचा मृत्यू झाल्यामुळे महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील वाघांच्या आहारात चिकन पूर्णपणे बंद करण्यात आले. महाराजबाग प्राणीसंग्रहालयात दोन वाघ आणि चार बिबटे आहेत. वाघ आणि बिबट्याच्या आहात आता चिकन ऐवजी म्हशीचे बिफ दिले जात आहे.
प्राणी संग्राहलय बंद ठेवणार
नागपुरात चिकनमुळे प्राण्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाल्यावर चंद्रपूर येथून पथक नागपूर प्राणी संग्रहालयात दाखल झाले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राण्यांना खाद्य देण्यापूर्वी त्यांच्या आहराची तपासणी करण्याची सांगितले. तसेच प्राणी संग्रहालय तात्पुरते बंद ठेवण्याचे निर्देश दिले. 2 जानेवारी रोजी आलेल्या अहवालानुसार H5N1 व्हायरस (बर्ड फ्लू) ने संक्रमित होते.
वनमंत्री गणेश नाईक यांना तीन वाघ आणि बिबट्याच्या मृत्यूसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, अजूनपर्यंत प्रयोगशाळेचा अहवाल मिळाला नाही. परंतु प्राथमिक माहितीनुसार चिकम खाल्यामुळे प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत अहवाल आल्यानंतर या प्रकाराबाबत काही सांगता येणार आहे.