राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी, महायुतीत राष्ट्रवादीचा वाटा कसा… प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले गणित

ncp praful patel: लक्षद्वीपचे खासदार दादांकडे आले आणि बोलले की एनडीएमध्ये चला म्हणून पण आत्ता त्यांनी आपला मार्ग हा बदलला आहे. पण लक्षद्वीपमध्ये आपल्या पक्षाचे संघटन वाढले आहे.

राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी, महायुतीत राष्ट्रवादीचा वाटा कसा... प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले गणित
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 1:13 PM

आजची ही बैठक महत्वाची आहे पण पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय रणनीती असावी. यासाठी आजची ही बैठक आहे. २०१९ च्या निवडणुकीत काहीतरी मोठे बदल होतील, असे वाटत होते. पण निकाल जेव्हा लागले तेव्हा मोदींच्या बाजूने निकाल लागला. २०२४ च्या निवडणुकीत संविधानाबद्दल आपल्या कार्यकर्त्यांच्या तसेच सर्वसामान्यांच्या बाबतीत प्रश्न निर्माण केला गेला. मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सभेदरम्यान बोललो महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात संविधानाबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. ४०० चा नारा आपला असल्याने चारशे पार करण्यासाठी आपल्याला हा मुद्दा अपप्रचार यावर नियंत्रण राखलं पाहिजे.

पुन्हा एकदा NDA चा सरकार येणार पण आपल्याला लोकसभेला कमी जागा मिळाल्या अशा चर्चा सुरु आहे. पण गेल्यावेळीस आपल्याला किती खासदार होते ते पण बघा ना. आपण साताऱ्याची जागा सोडली, असे म्हटले जात आहे. पण आपण त्या बदल्यात राज्यसभेची एक जागा घेतली आहे. भुजबळ साहेबांच्या खासदारकीच्या तिकिटीच्या संदर्भात थोडे राजकारण झाले होते. पण त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. दुर्दैवाने शिंदे यांनी आग्रह केल्यामुळे आम्हाला ती जागा सेनेला सोडावी लागली.

आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे. आपल्या पक्षाला मजबूत करायचं आहे. महायुतीत आपण आहोत त्यामुळे त्या महायुतीला देखील मजबूत करण्याचं आपलं काम आहे. विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेसारखी परिस्थिती होणार नाही, याकरिता खबरदारी घेणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकाधिक जागा आपल्या वाट्याला येतील, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.

हे सुद्धा वाचा

धीरज शर्मा आमच्याच हाताखालती तयार झालेला आहे. पूर्वीच्या राष्ट्रवादीत देखील आमच्यासोबत काम करत होता. निकाल लागण्या अगोदरच धीरज शर्मा आपल्या सोबत येत आहे, हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा आपल्याला पुन्हा मिळवायचा आहे. एकवेळेस आपले पक्षाचे मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, ओडिशामध्ये आमदार आणि खासदार होते. त्यामुळे आपल्याला पुन्हा हे वैभव प्राप्त करायच आहे. लक्षद्वीपचे खासदार दादांकडे आले आणि बोलले की एनडीएमध्ये चला म्हणून पण आत्ता त्यांनी आपला मार्ग हा बदलला आहे. पण लक्षद्वीपमध्ये आपल्या पक्षाचे संघटन वाढले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.