Banking on Rationing : आयडिया एकदम झक्कास! रेशनिंग दुकानातून मिळणार पैसे, या सरकारने घेतला पुढाकार
Banking on Rationing : आता ग्रामीण भागातील जनतेला बँकिंग सुविधांसाठी तालुक्याच्या अथवा बाजाराच्या गावाला जावं लागणार नाही. पोस्ट ऑफिसनंतर आता रेशनिंग दुकानावर पण त्यांना बँकेच्या सुविधा मिळतील.
नवी दिल्ली : राज्य सरकारने एक जबरदस्त आयडियाची कल्पना लढवली आहे. ग्रामीण भागातील जनतेला बँकिंग सुविधांसाठी आता तालुक्याच्या अथवा बाजाराच्या गावाला जावं लागणार नाही. पोस्ट ऑफिसनंतर रेशन दुकानावर (Ration Shops) पण त्यांना बँकेच्या सुविधा मिळतील. अन्नधान्य पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या खात्यातंर्गत शिधा वाटप केंद्र अगदी गावपातळीवर सुरु आहेत. पण सध्या या यंत्रणेला मरणकळा आली आहे. या यंत्रणा सक्षम आणि मजबूत करण्यासाठी त्यांना बँकिंग सुविधा (Banking Facilities on Rationing) केंद्रासारखे अधिकार देण्यात येतील. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला गावातच बँकिंग सुविधा उपलब्ध होतील. याविषयीचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
पोस्ट कार्यालयाचा कायापालट केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने पोस्टाला बँकिंग सुविधांचा अधिकार देऊन त्यांचा कायापालट केला आहे. मोडकळीस आलेली यंत्रणा आता सक्षण झाली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधेमुळे ग्रामीण भागात बँकिंगचे जाळे मजबूत झाले आहे. 2018 साली ही सेवा प्रत्यक्षात आली. त्याचे फायदे आता सर्वांना दिसू लागले आहेत. पोस्टाने कात टाकली आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ पोस्टाने बँकिंग प्रणालीला दिल्याने युपीआय पेमेंटसह ऑनलाईन व्यवहार करणे सोपे झाले आहे.
रेशनसह बँकिंग व्यवहार आता रेशन दुकानांवर केवळ धान्यच मिळणार नाही तर बँकिंग सुविधा पण मिळतील. तुम्हाला रेशन दुकानदाराकडून तुमच्या खात्यातील पैसा घेता येतील. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच या खात्यात पैसे जमा करता येईल. त्यासाठी बायोमॅट्रिक प्रणालीचा वापर होईल. त्यामुळे व्यवहारातील फसवणूक टळेल.
नोडल ऑफिसर नेमणार स्वस्त धान्य दुकानांवर बँकिंग सुविधा पुरविण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल. स्वस्त धान्य दुकानदारांना बँकिंग सुविधा केंद्र सुरु करण्यासाठी एक करार करावा लागेल. त्यामार्फत दुकानदाराला बँकिंग प्रणालीचे प्राथमिक प्रशिक्षण देऊन लागलीच बँकिंग सुविधा सुरु करता येईल.
ग्रामीण भागात अमुलाग्र बदल या सुविधेमुळे ग्रामीण भागात अमुलाग्र बदल होईल. या केंद्रांमुळे ग्रामीण भागात व्यवहाराला चालना मिळेल. तसेच बँकांना व्यवसाय वाढविता येईल. त्यांची कर्ज प्रकरणे वाढतील. त्यांना महसूल प्राप्त होईल. ग्रामीण भागातील जनतेला बँकिंग सुविधा आता गावातच उपलब्ध होतील, अशी आशा अन्नधान्य पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने व्यक्त केली.
सर्व व्यवहार डिजिटल हे सर्व व्यवहार डिजिटल असतील. ग्राहकाच्या हातात रोख रक्कम देण्यात येईल. अथवा त्याच्या खात्यात रक्कम हस्तांतरीत करता येईल. स्वस्त धान्य दुकानदारामुळे गावात खेळते भांडवल उपलब्ध होईल. तसेच त्याला दोन पैसे कमविण्याची संधी मिळेल. बँक आणि स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये बँकिंग सुविधेविषयीचा करार होणार आहे.