योगींनंतर आता मोदींनी दिला नवा नारा, भाजपचा प्रचार पुन्हा हिंदुत्वाच्या ट्रॅकवर

Maharashtra Election : अजित पवार यांना त्यांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपायची आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाची 10 टक्के तिकिटे अल्पसंख्याकांना देणार असल्याचेही सांगितले होते. त्यांची व्होट बँक लक्षात घेऊन त्यांनी सीएम योगींच्या घोषणेवर आक्षेप घेतल्याचे समजते. त्यानंतर आता मोदींनीही नवा नारा दिला आहे.

योगींनंतर आता मोदींनी दिला नवा नारा, भाजपचा प्रचार पुन्हा हिंदुत्वाच्या ट्रॅकवर
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 9:58 PM

महाराष्ट्राच्या प्रचारात मोदी, शाहांची एंट्री झालीय. योगी यांनी याआधी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला होता. आता मोदींनीही एक है तो सेफ है म्हटलं आहे. भाजपनं प्रचार कसा हिंदुत्वाच्या ट्रॅकवर नेलाय. मोदी आणि शाहांनी आपल्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातला प्रचाराचा अजेंडा सेट केला. भाजपचा प्रचार हिंदुत्वावरच असेल हे मोदी-शाहांनी दाखवून दिलं. बटेंगे तो कटेंगेच्या पुढे जात एक है तो सेफ वाली घोषणा मोदींनीही दिली.

पंतप्रधान मोदी यांची धुळे आणि नाशिकमध्ये सभा झाली. अमित शाह यांनी शिराळा, इचलकरंजी आणि सांगलीत मोर्चा सांभाळला. महाराष्ट्र लुटण्यासाठी गद्दारी करुन माझं सरकार पाडलं अशी टीका उद्धव ठाकरे प्रचार सभेतून करत आहेत. तर महाविकास आघाडीनंच धोका देवून महाराष्ट्राला लुटल्याचा निशाणा मोदींनी साधला.

आधी योगींनी महाराष्ट्रात बटेंगे कटेंगे अशी घोषणा दिली. मोदींनी एक है तो सेफ है म्हटलंय आणि फडणवीसांनी पुन्हा एकदा धुळ्यातून व्होट जिहादचा आरोप केला. व्होट जिहादपासून जागं व्हा नाही तर नेहमीसाठी झोपावं लागेल, असं फडणवीस म्हणाले आहेत.

शिराळाच्या सभेतून अमित हिंदुत्वाचा मुद्दा पुढं नेत. व्होट बँकेसाठीच अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे दर्शनाला आले नाहीत अशी टीका केली आहे.

लाडकी बहीण योजनेद्वारे महायुतीनं 2100 रुपये देण्याचा वायदा केला तर राहुल गांधी खटाखट 3 हजाराचं वचन दिलं. त्यावरुनही अमित शाहांनी आपल्या स्ट्राईलनं समाचार घेतला.

पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झालीय. दोघांनीही सुरुवातीला यापुढेही काँग्रेस आणि महाविकास आघाडीला हिंदुत्वावरुनच घेणार याची झलक दाखवून दिलीये.

दुसरीकडे आज अजित पवारांनी म्हटले की, पक्षात वेगवेगळे मतप्रवाह असतात. याबाबत मला कोणावर टीका करायची आहे. खोत हे भाजपचे नाहीत. ते महायुतीचे एक घटक आहेत. अलीकडे राजकारणातील स्तर घसरला आहे. सदाभाऊ खोत यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती खूप वेगळी आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र नाहीयृ. हा फुले, शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याने यांनी सर्व वर्गाला सोबत घेऊन जाण्याची शिकवण दिली आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'.
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले...
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले....
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर.
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका.
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा.
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य.
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.