Agniveer: तोफेत गोळा लोड करत असताना नाशिकमध्ये दोन अग्नीवीरांचा मृत्यू

तोफेचा गोळा लोड करत असताना ब्लास्ट झाला. त्यात अग्नीवीर गोहिल सिंग (वय 20) आणि सैफत शित (वय 21) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने देवळाली येथील सैनिकी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Agniveer: तोफेत गोळा लोड करत असताना नाशिकमध्ये दोन अग्नीवीरांचा मृत्यू
artillery firing range
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 11:21 AM

Agniveer Death: नाशिकमध्ये भारतीय सैन्यातील दोन अग्नीवीरांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. तोफेचा गोळा लोड करत असताना ब्लास्ट झाला. त्यात अग्नीवीर गोहिल सिंग (वय 20) आणि सैफत शित (वय 21) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने देवळाली येथील सैनिकी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. आयएफजी फील्ड गणचा तुकडा शरीरात घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला. नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय घडले प्रकरण

नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये भारतीय लष्कारातील जवानांना प्रशिक्षण देण्यात येते. देशात अग्नीवीर योजना सुरु झाल्यापासून अग्नीवीर योजनेतील सैनिकांचे प्रशिक्षण नाशिकमधील देवळाली भागात होते. या प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्नीवर जवानांना तोफेचा गोळा लोड करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यावेळी अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये गोहिल सिंग आणि सैफत शित गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे खळबळ उडली आहे. आता पोलीस आणि लष्कराकडून या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.

गुरुवारी दुपारी १२ वाजता अग्नीवीर जवानांची तुकडी नाशिकमधील शिंगवे बहुलाला फायरिंग रेंजमध्ये सरावासाठी गेली होती. यावेळी तोफेजवळ गोळ्याचा स्फोट झाला. त्यामुळे बॉम्बचे शेल उडून त्या अग्नीवीर जवानांच्या शरीरात गेले. या घटनेत दोघ जवानांचा मृत्यू झाला. तसेच एक अग्निवीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे अग्नीवीर योजना

भारतीय सशस्त्र दलात भरती करण्यासाठी अग्नीवीर योजना नरेंद्र मोदी सरकारने 2022 मध्ये सुरू केली. या योजनेत निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्ष लष्करात नोकरी दिली जाते. त्यानंतर 25% उमेदवारांची सशस्त्र दलात नियमित केडर म्हणून निवड होते. या योजनेतील जवानांनी विविध राज्य सरकार पोलीस दल आणि केंद्र शासनाच्या सुरक्षा दलात भरतीसाठी आरक्षण दिले आहे.

टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी.
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?.
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे.
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका.
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला.