अहिराणी कविता, कथाकथन आणि मौखिक साहित्य, बोलीभाषेच्या जागरसाठी दिग्गजांची मांदियाळी

अहिराणी भाषेचे नामांकित साहित्यिक, ज्यांनी अहिराणी भाषेसाठी आपलं आयुष्य वाहून घेतले त्यांचं अप्रतिम असं साहित्य सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं, हा यामागचा महत्त्वाचा उद्देश असल्याचं कवी रमेश धनगर यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी बोलताना सांगितलं (Ahirani language Literature).

अहिराणी कविता, कथाकथन आणि मौखिक साहित्य, बोलीभाषेच्या जागरसाठी दिग्गजांची मांदियाळी
Follow us
| Updated on: May 24, 2020 | 12:35 PM

मुंबई : राज्यभरात लॉकडाऊनदरम्यान अहिराणी भाषिक नागरिकांचं मनोरंजन व्हावं (Ahirani language Literature), अहिराणीचा गोडवा निर्माण व्हावा आणि संस्कृतीचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने फेसबुकवर ‘अहिराणी बोली’ नावाचं फेसबुक पेज सुरु करण्यात आलं आहे. जळगावच्या भडगाव तालुक्याचे साहित्यिक रमेश धनगर यांनी या फेसबुक पेजची निर्मिती केली. अनेक दिग्गज साहित्यिकांनी या उपक्रमात पुढाकार घेतला आहे (Ahirani language Literature).

या फेसबुक पेजला अहिराणी भाषेत ‘माननं पान’ म्हणजेच सन्मानाचं पान असंही संबोधलं जात आहे. या पेजवर दररोज एक ते दीड तास अहिराणी भाषिक प्रेक्षकांना कविता, कथाकथन आणि गाणी यांची मेजवानी चाखायला मिळत आहे.

विशेष म्हणजे दिग्गजांचं फेसबुक लाईव्ह सुरु असताना कुणी पेजवर आलं तर ती व्यक्ती जवळपास तासभर पेजवर खिळून राहते. अहिराणी भाषेत अवीट असा गोडवा आहे. याच मधाळ गोडपणामुळे दोन कोटी अहिराणी भाषिकांना एकत्र आणण्याचा हा रमेश धनगर यांचा प्रांजळ प्रयत्न आहे.

सन्मानाच्या मानलं जाणाऱ्या या फेसबुक पेजवर आतापर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यामध्ये मालेगावचे ज्येष्ठ साहित्यिक एस. के. बापू पाटील, डॉ. रमेश सुर्यवंशी, कमलाकर आबा देसले, सुनिल गायकवाड, अशोक शिंदे, कल्याणचे प्रशांत मोरे, नाशिकच्या सुनिता पाटील, मोहन पाटील, अहिराणी चित्रपट अभिनेते विजय पवार यांचा समावेश आहे.

अहिराणी भाषेचे नामांकित साहित्यिक, ज्यांनी अहिराणी भाषेसाठी आपलं आयुष्य वाहून घेतले त्यांचं अप्रतिम असं साहित्य सोशल मीडियाच्या माध्यमातून अहिराणी भाषिक लोकांपर्यंत पोहोचावं, हा यामागचा महत्त्वाचा उद्देश असल्याचं कवी रमेश धनगर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितलं (Ahirani language Literature).

“लॉकडाऊनदरम्यान लाखो नागरिक सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडिया हे एक प्रभावी आणि सहजच उपलब्ध होणारं असं माध्यम आहे. या माध्यमामार्फत आपण हजारो खान्देशी आणि अहिराणी भाषिक लोकांपर्यंत बोलीभाषेचा गोडवा निर्माण करु शकतो, या विचारातून फेसबुकवर ‘अहिराणी बोली’ नावाचं पेज सुरु केलं”, असं रमेश धनगर यांनी सांगितलं.

“अहिराणी भाषेत जात्यावरची गाणी, लग्नाची गाणी, आखाजीची गाणी अशा अनेक स्वरुपातील अमाप असं मौखिक साहित्य आहे. या मौखिक साहित्याचं जतन आणि संवर्धन करुन नव्या साहित्याचा उदय करण्याचा ध्यास खान्देशातील अनेक ज्येष्ठ अहिराणी साहित्यिकांनी घेतला आहे. या साहित्यिकांना अहिराणी भाषिक जनतेनं डोक्यावर घेणं अपेक्षित आहे”, अशी प्रतिक्रिया खान्देश हीत संग्रामचे प्रवक्ते सुरेश पाटील यांनी दिली.

रमेश धनगर यांच्या या उपक्रमात ज्येष्ठ साहित्यिक बापूसाहेब हटकर, प्रा. सदाशिव सुर्यवंशी, खानदेश हीत संग्रामचे प्रवक्ते सुरेश पाटील, लेखिका लतिका चौधरी, कवी ज्ञानेश्वर भामरे, नाशिकचे अजय बिरारी, विना बागूल, अमळनेरचे तहसीलदार सुदाम महाजन, मालेगावचे ज्येष्ठ पत्रकार नाना महाजन असे शेकडो अहिराणी साहित्यिक जोडले गेले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.