Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pre-monsoon rains : तापणाऱ्या दौंडसह अहमदनगर, मनमाड आणि कराडला पावसाने झोडपले; आला शेतीच्या कामांना वेग

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी मनमाडला वरुण राजाने सोसाट्या वाऱ्यासह हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसत होत्या. वादळी वाऱ्यामुळे शहरातील इंडियन हायस्कुल काही वर्ग खोल्यांच्या छताचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Pre-monsoon rains : तापणाऱ्या दौंडसह अहमदनगर, मनमाड आणि कराडला पावसाने झोडपले; आला शेतीच्या कामांना वेग
मराठवाड्यात पावसाची अवकृपाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 11:17 PM

पुणे/अहमदनगर/नाशिक/सातारा : राज्यात मान्सुनपूर्व पावसाने (Pre-monsoon rains) हजेरी लावण्यास सुरूवात केली असून गेल्या काही दिवसांपासून पावस हडत आहे. राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झोडपून काढले होते. तसेच जूनच्या या आठवड्यातही झोडपले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी कोकणातील (Konkan) रत्नागिरीला पावसाने अक्षरशहा दोन दिवस धुतले होते. ज्यामुळे तेथील नागरिकांना चांगलाच गारवा अनुभवायाला मिळत आहे. आता वरून राज्याने अशीच किमया दौंडसह अहमदनगर, मनमाड आणि कराडच्या लोकांवर केली आहे. येथे ही आज अवकाली पावसाने हजेरी लावत जोरदार बॅटींग केली आहे. ज्यामुळे वाढत्या गर्मीने हैराण झालेल्या लोकांनी दिलासा मिळाला आहेच. तर शेतामध्ये पेरणीपूर्व मशागतींच्या (pre-sowing cultivation) कामांना वेग आला आहे. तर अनेक ठिकानी सुरू असणाऱ्या पेरणीपूर्व मशागतींच्या कामां ब्रेक लागला आहे.

कुसेगावमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुसेगावमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. सायंकाळी पावसाचे आगमन झाल्याने कुसेगाव परिसरात गारवा निर्माण झाला. तर जून महिन्याच्या सुरूवातीलाच पाऊस झाल्याने येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सकाळ पासूनच कडाक्याचे ऊन राहिल्याने दिवसभर दमट वातावरण होते. मात्र सायकांळी पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे पावसात भिजण्याचा मोह लहान मुलांना आवरता आला नाही. तर सुमारे 30 मिनिटे दमदार बरसलेल्या सरींनी कुसेगाव-पाटस या अष्टविनायक मार्गावर पाणीच पाणी केले.

संगमनेर / अहमदनगरला पावसाची दमदार सुरूवात

अहमदनगर आणि संगमनेरला ही पावसाची दमदार सुरूवात झाली. तर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची दमदार बँटींग झाली. तसेच अहमदनगर आणि संगमनेरला पहिल्याच पावसाचे जोरदार आगमन केल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पावसाची त्सुनामी पहायला मिळाली. येथे एक तास धुवांधार पाऊस पडला. ज्यामुळे वादळी पावसाने अनेकांची दाणादाण उडवली. वादळी पावसामुळे संगमनेर ते लोणी दरम्यान रस्त्यावर शेकडो झाडे कोसळली. तर काही ठिकाणच्या घरांचे छत देखील उडाली.

हे सुद्धा वाचा

सिंधुदुर्गात मिरगाची सुरूवात

सिंधुदुर्गात दरवर्षी प्रमाणे मिरगाचा पाऊस कोसळला. मात्र हा पाऊस जिल्ह्यातील कणकवली व वैभववाडी तालुक्यातील काही भागातच लागला. मिरग आणि पावसाचे नाते अतूट आहे. मिरगाच्या दिवशी कोकणात पाऊस कोसळतोच कोसळतो. एखादा अपवाद असेल ही पण हलका का होईना लागतो असा अनुभव आहे. हे सूत्र यावर्षी पावसाने खर ठरवलं असून सायंकाळ नंतर हलका हलका पाऊस पडू लागला. जिल्ह्यात इतर भागात वातावरणात काळोख दाटला होता. काल ही याच भागात या पावसाने हजेरी लावली होती. मान्सूनपूर्व पाऊस लागत असला तरी लोकांना व बळीराजाला आता मान्सूनची आस लागली आहे.

मनमाडला सोसाट्याच्या वाऱ्याने शाळेचे पत्रे उडाले

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी मनमाडला वरुण राजाने सोसाट्या वाऱ्यासह हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसत होत्या. वादळी वाऱ्यामुळे शहरातील इंडियन हायस्कुल काही वर्ग खोल्यांच्या छताचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर औरंगाबादकडे जाणाऱ्या रेल्वे लाईनवर झाड ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. मात्र रेल्वेच्या आपत्तकालीन पथकाने घटना स्थळी दाखल होत भर पावसात झाड रुळावरून बाजूला केल्याने रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. वाऱ्याने शहरातील बहुतेक ठिकाणी झाडे उन्मळली तर अनेक झाडांच्या फांद्या तुटून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

वीजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावस

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात ही यावेळी पावसाने हजेरी लावली. कराडमधील मसूर परिसरात सांयकाळी वीजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाने सुमारे तासभर बॅटींग केली. तर भागाला झोडपले. त्यामुळे मसूर परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. यामुळे शेतामध्ये सुरू असलेली पेरणीपूर्व मशागतीची कामे ठप्प झाले होते.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.