शिर्डीला छावणीचं स्वरुप, देशाची सर्वात महत्त्वाची व्यक्ती उद्या साईचरणी लीन होणार

शिर्डीमध्ये सध्याच्या घडीला महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा पोलीस बंदोबस्त पाहता शिर्डीला छावणीचं स्वरुप आल्यासारखं चित्र दिसत आहे.

शिर्डीला छावणीचं स्वरुप, देशाची सर्वात महत्त्वाची व्यक्ती उद्या साईचरणी लीन होणार
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 7:29 PM

अहमदनगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या शिर्डी दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिर्डीतील घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. द्रौपदी मुर्मू या मंगळवारी संध्याकाळी नागपुरात दाखल झाल्या. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावर गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बुधवारी गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली.

द्रौपदी मुर्मू या कालच्या दिवसभराच्या कार्यक्रमांना हजेरी लावून आज मुंबईत दाखल झाल्या. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस हे हजर होते. त्यानंतर राजभवनावर राष्ट्रपतींसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपतींचा हा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा आहे. राष्ट्रपती उद्या शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील घडामोडींना वेग आला आहे. पोलीस आणि प्रशासन या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले आहेत.

‘असा’ असेल राष्ट्रपतींचा दौरा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं शिर्डी विमानतळावर उद्या दुपारी 12 वाजता आगमन होणार आहे. विमानतळावर त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ते साईबाबांच्या मंदिरापर्यंत दहा ते बारा किमीचा प्रवास कारने करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रपती शिर्डीत येणार असल्याने प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

शिर्डीला छावणीचं स्वरुप

साईबाबा संस्थान, पोलीस प्रशासन सर्व गोष्टींची काळजी घेत आहेत. सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील हजर राहणार आहेत. तर राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत प्रचंड सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीला छावणीचं स्वरुप आलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.