AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar Crime Video :वाहनाला डॅश केलं म्हणून चांदणी चौकातच एकमेकांना हाणलं; हाणामारी बघण्यासाठी झुंबड

चांदणी चौकातील आजच्या हाणामारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दोन्ही गटात हाणामारी होत असताना गडबड आणि गोंधळ दिसून आला. खूप वेळ दंगा आणि गोंधळ सुरु असूनही या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.

Ahmednagar Crime Video :वाहनाला डॅश केलं म्हणून चांदणी चौकातच एकमेकांना हाणलं; हाणामारी बघण्यासाठी झुंबड
अहमदनगरमध्ये वाहनाला डॅश मारला म्हणून जोरदार हाणामारीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 7:48 PM

अहमदनगरः शहरातील चांदणी चौकामध्ये (Chandani chauk) नेहमीच वाहनांची वर्दळ असल्याने छोट्या मोठ्या वादवादीचे प्रसंग घडत असतात. आजही नगरमधील चांदणी चौकामध्ये गाडीला ओव्हरटेक (Overtake) करताना ट्रक चालकाने डॅश (Dash) केला म्हणून जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे बराच वेळ चांदणी चौकामध्ये काही काळ ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हाणामारी झाल्याने चांदणी चौकात लोकांची गर्दी जमा झाली होती. यावेळी एकमेकांना मारहाणही करण्यात आल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.

गाडीला डॅश मारला म्हणून एकमेकांमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यावसन नंतर मारामारीत झाले. यावेळी नागरिकांच्या मध्यस्थीमुळे या वादावप पडदा टाकण्यात आला. तरीही हे वाद टोकाला जाऊनही या ठिकाणी पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.

इकडे हाणामारी तिकडे शुटींगचं पडलय

हा वाद होत असताना काही जण मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होते, तर काहीजण वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते. ज्या ज्या लोकांनी या वादाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले, त्यामुळे हा वाद काही क्षणातच सोशल मीडियावरही व्हायरल झाला. त्यामुळे या वादाची दिवसभर नगरमध्ये चर्चा होती.

नेहमीच वाहनांची कोंडी

अहमदनगमधील चांदणी चौक परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची कोंडी होत असते. वाहनांची कोंडी झाल्यामुळे छोटे मोठे अपघात आणि वादावादीचे प्रसंग घडत असतात. वाहनांची वर्दळ होत असूनही या ठिकाणी कायमस्वरुपी वाहतून पोलीसही नसतो. त्यामुळे वाद झाले की, चौकात गर्दी जमा होणे, वाहतूक कोंडी होणे असे सर्रास प्रकार या ठिकाणी घडत असतात. याबाबत नागरिकांनी तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. चांदणी चौकात काम पुलाचे काम सुरु असूनही आणि नागरिकांनी तक्रार करुनही प्रशासनाने याकडे अजूनही लक्ष दिले नाही.

हाणामारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

चांदणी चौकातील आजच्या हाणामारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दोन्ही गटात हाणामारी होत असताना गडबड आणि गोंधळ दिसून आला. खूप वेळ दंगा आणि गोंधळ सुरु असूनही या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.

बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.