आदित्य ठाकरे मांडी घालून बसले, विद्यार्थिनीला टाळी देत संवाद, बाळासाहेबांच्या नातवाचा हटके अंदाज काँग्रेस नेत्याला भावला

सध्या आदित्य ठाकरे यांनी नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींशी थेट जमिनीवर बसून संवाद साधला आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांचा फोटो काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शेअर केलाय.

आदित्य ठाकरे मांडी घालून बसले, विद्यार्थिनीला टाळी देत संवाद, बाळासाहेबांच्या नातवाचा हटके अंदाज काँग्रेस नेत्याला भावला
आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 9:52 PM

अहमदनगर : राजकारण म्हटलं तर डावपेच, शह-काटशह या गोष्टी आल्याच. पण या क्षेत्रात असे काही किस्से असतात की ते मनाचा ठाव घेतात. एखादा राजकीय व्यक्ती मनाला भावणारं असं काहीतरी करून जातो, ज्याची सगळीकडे चर्चा होते. सध्या आदित्य ठाकरे यांनी नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींशी थेट जमिनीवर बसून संवाद साधला आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांचा फोटो काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शेअर केलाय. या फोटोची सगळीकडे चर्चा होत असून राजकारणात काही गोष्टीकडे राजकारणाच्या पलीकडे असतात अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

aditya thackeray

आदित्य ठाकरे मांडी घालून बसले

आदित्य ठाकरे यांनी दिली आश्रम शाळेला भेट

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे दंडकारण्य अभियान सांगता सोहळ्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी अदित्य‌ यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ठाकरे यांनी संगमनेरच्या कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळेस भेट दिली. ही शाळा आदर्श आदिवासी आश्रमशाळा म्हणून नावाजलेली आहे. यावेळी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळेपणाने तसेच आपुलकीने संवाद साधला.

आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे जमिनीवर बसले, टाळी देत संवाद

आदित्य ठाकरे यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थी तसेच विद्यार्थिंनीशी मनमोकळेपणाने संवाद साधला. ते विद्यार्थांसोबत जमिनीवर खाली बसले. तसेच एका विद्यार्थिनाली टाळी देत अडचणी जाणून घेतल्याक. मंचावर बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम उपस्थित असताना आदित्य ठाकरे थेट जमिनीवर बसल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आदित्य थेट जमिनीवर बसल्यानंतर विद्यार्थ्यांनीदेखील त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

पक्ष वेगळे, वैचारिक मतभेद तरीही फेसबूकवर पोस्ट शेअर

आदित्य ठाकरेंची ही कृती बाळासाहेब थोरात यांना चांगलीच आवडली आहे. त्यांनी आदित्य यांचा फोटो आपल्या फेसबूक अकाऊंटवर अपलोड केलाय. तसं पाहायचं झालं तर हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा एकूण तीन पक्षांची राज्यात सत्ता आहे. सरकार म्हणून हे सोबत असले तरी ठाकरे आणि थोरात यांच्यात वैचारिक मतभेद आहेत. मात्र हे कच्चे दुवे मागे सोडून बाळासाहेब थोरात यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांचा फोटो आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केला आहे. सध्या या फोटोची विशेष चर्चा होत आहे.

aditya thackeray

ठाकरे यांच्याशी विद्यार्थ्यांनीदेखील संवाद साधला

इतर बातम्या :

सर, बेइज्जती केली जातेय, घाबरवण्याचा प्रयत्न होतोय, समीर वानखेडे भडकले, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांकडे तक्रार

ठाकरे सरकारला शेतकऱ्यांऐवजी नबाब मालिकांचा जावई, शाहरुखचं पोरगं कसं सुटेल यामध्ये स्वारस्य, विनायक मेटेंचा आरोप

Special story | देशात हलकल्लोळ, 29 गोळ्या झाडून इंदिरा गांधी यांची हत्या, त्याच दिवशी पंतप्रधानपदाचा पेच कसा सुटला?, वाचा इन्साईड स्टोरी

(ahmednagar sangamner aditya thackeray meet and talk to students balasaheb thorat shared photo on social media)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.