‘अण्णा हजारे यांची हत्या करणार’.. कुणी दिला इशारा? राज्यात खळबळ

1 मे रोजी अण्णा हजारेंची राळेगण सिद्धीत जावून हत्या करणार, असा इशारा एका नागरिकाने दिलाय. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. अण्णा हजारेंच्या समर्थकांमधूनही भीती व्यक्त केली जातेय.

'अण्णा हजारे यांची हत्या करणार'.. कुणी दिला इशारा? राज्यात खळबळ
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 1:50 PM

मनोज गाडेकर, श्रीरामपूर (अहमदनगर ) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांची हत्या करणार असल्याचा इशारा एका संतप्त नागरिकाने दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका गावातील शेतीच्या वादातून हा इशारा देण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून एका कुटुंबावर अन्याय होत असल्याची भावना, कुटुंबियांची आहे. अण्णा हजारे तसेच प्रशासनालाही निवेदने देऊन झाली, मात्र काही कारवाई होत नसल्याचा आरोप सदर कुटुंबाने केलाय. अखेर १ मे महाराष्ट्र दिनाला अण्णा हजारेंचीच हत्या करणार असल्याचा इशारा या कुटुंबातील संतोष गायधने याने दिलाय.

काय आहे नेमकं प्रकरण?

या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या नागरिकाने अशा प्रकारे उद्विग्नतेतून इशारा दिलाय. शेतीच्या वादातून संगनमताने आपल्या कुटुंबावर अन्याय झालाय, असा आरोप त्याने केलाय. शेतीच्या वादातून गटातील ९६ जणांनी संतोष गायधने यांच्या परीवारावर दबाव आणला आहे. कुटुंबावर अनेक खोट्या केस दाखल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगतेय, अशी व्यथा संतोष गायधने यांनी मांडली आहे.

काय दिला इशारा?

शेतीचा वाद आणि खोट्या केसेसच्या भीती गायधने कुटुंबाने अखेर टोकाची भूमिका घेतली आहे. या प्रकरणात त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह वरीष्ठ पोलीस अधिकारी तसेच मंत्र्यांनाही निवेदन दिले होते. मात्र त्यांच्याकडूनही काहीच कारवाई झाली नाही, असा आरोप गायधने कुटुंबियांनी केलाय. अखेर या कुटुंबाने राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे.  1 मे रोजी अण्णा हजारेंची राळेगण सिद्धीत जावून हत्या करणार, असा इशारा श्रीरामपूरातील संतोष गायधने यांनी दिलाय. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. अण्णा हजारेंच्या समर्थकांमधून याचे पडसाद उमटत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.