मतदानाला एक दिवस बाकी असतानाच अहमदनगरमध्ये राडा, दोन गट एकमेकांना भिडले, काय घडलं?

अहमदनगरला दोन गटात राडा झालाय. हा राडा वैयक्तिक कारणातून झाल्याची माहिती मिळत आहे. या वादातून वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आलीय. शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा माजी नगरसेवक सचिन जाधव आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सागर मुर्तडकर यांच्या गटात ही हाणामारी झालीय.

मतदानाला एक दिवस बाकी असतानाच अहमदनगरमध्ये राडा, दोन गट एकमेकांना भिडले, काय घडलं?
मतदानाला एक दिवस बाकी असतानाच अहमदनगरमध्ये राडा
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 6:38 PM

राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीमुळे कडकडत्या उन्हाळ्यात राज्याचं राजकीय वातवरणही तापलेलं बघायला मिळत आहे. विविध पक्षांच्या जोरदार प्रचासभा, मिरवणुका निघत आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात उद्या 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झालंय. उद्या सकाळपासून मतदानाला सुरुवात होईल. पण मतदानाच्या एक दिवस आधी अहमदनगरमध्ये एक अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झालाय. त्यामुळे पोलीसही सतर्क झाले आहे.

अहमदनगरला दोन गटात राडा झालाय. हा राडा वैयक्तिक कारणातून झाल्याची माहिती मिळत आहे. या वादातून वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आलीय. शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा माजी नगरसेवक सचिन जाधव आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सागर मुर्तडकर यांच्या गटात ही हाणामारी झालीय. दगडफेकीत सागर मुर्तडकर यांचे कार्यालय फुटले आहे. तसेच एक स्कार्पिओदेखील फोडण्यात आलीय. अहमदनगरच्या मंगलगेट परिसरात ही हाणामारी झाली आहे.

घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा

या हाणामारीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. सध्या तिथे तणावपूर्व शांतता बघायला मिळत आहे. पोलिसांकडून परिस्थिती पुन्हा पूर्वरत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. याशिवाय पुन्हा तशी घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. त्यामुळे पोलिसांची मोठी व्हॅन आणि फौजफाटा घटनास्थळी दाखल आहे.

सचिन जाधव जखमी

जाधव आणि मुर्तडकर हे एकमेकांचे विरोधक आहेत. तर या मारहाणीत सचिन जाधव हे जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय. यावेळी जाधव यांना हॉस्पिटलमध्ये येऊन मविआचे उमेदवार निलेश लंके यांनी भेट घेतलीय. तर माझ्यावर आतापर्यंत आरोप झाले. मात्र कोण मारहाण करताय हे नगरकरांना दिसल्याचं लंके यांनी म्हटलंय. नगर शहरात पुन्हा गुंडगिरी पाहायला मिळाली. आमची नागरिकांना संरक्षण देण्याची भूमिका असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.