अजितदादांनी मन जिंकलं; टपरी चालकाशी चाय पे चर्चा, स्वतः व्हिडिओ शेअर करत संघर्षाची काय दिली माहिती
Ajit Pawar Chai Pe Charcha : अजितदादा हे रोखठोक म्हणून ओळखले जातात. ते शिस्तप्रिय आहेत. पण आज त्यांची ही हळवी बाजू पण समोर आली आहे. त्यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ शेअर करत एका चहा विक्रेत्याची संघर्षगाथा मांडली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक म्हणून ओळखले जातात. ते शिस्तप्रिय आहेत. पण आज त्यांची ही हळवी बाजू पण समोर आली आहे. त्यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ शेअर करत एका चहा विक्रेत्याची संघर्षगाथा मांडली आहे. दादांनी या चहा विक्रेत्याने तयार केलेला चहा सुद्धा पिला. त्यांनी या टपरी चालकाशी चाय पे चर्चा केली. त्यांनी सर्वसामान्य माणसाचा प्रामाणिकपणा, त्याचा संघर्ष आणि त्या कष्टातून कसं यश मिळते याची माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ही संघर्ष कथा आता चर्चा होत आहे.
कष्ट बापाचे, यश लेकाचे!




उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया एक्स या प्लॅटफॉर्मवर टपरी चालकाचा संघर्ष आणि त्याच्या मुलाचे यश यासंबंधीची पोस्ट शेअर केली आहे. दीपस्तंभ बाप म्हणून त्यांनी या वडिलाची पाठ थोपटली आहे. तर त्यांनी कष्ट बापाचे आणि यश लेकाचे असा संदेश या पोस्टमधून दिला आहे.
काय पोस्ट केली शेअर
“काल जामखेडच्या दौऱ्यावर असताना व्यस्त वेळापत्रकातून क्षणभर विश्रांती म्हणून एका चहाच्या टपरीवर सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा चहाचा एक घोट घेतला. चहा आनंदाचा, समाधानाचा यासाठीच म्हणतोय की, या टपरीचे मालक बंडू ढवळे यांच्याशी दोन घटका आपुलकीचा संवाद साधला तर कळलं की, त्यांनी अपार कष्टातून आपल्या मुलाला MBBS डॉक्टर बनवलं. स्वतः झिजून मुलाच्या जीवनाला, त्याच्या स्वप्नांना ढवळे यांनी आकार देण्याचं अमूल्य काम केलं. दिशादर्शकाची भूमिका बजावली. ढवळे यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच.. त्यांच्या जिद्दीला, चिकाटीला माझा सलाम..!”
दीपस्तंभ बाप..!
कष्ट बापाचे, यश लेकाचे..!
काल जामखेडच्या दौऱ्यावर असताना व्यस्त वेळापत्रकातून क्षणभर विश्रांती म्हणून एका चहाच्या टपरीवर सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा चहाचा एक घोट घेतला. चहा आनंदाचा, समाधानाचा यासाठीच म्हणतोय की, या टपरीचे मालक श्री. बंडू ढवळे यांच्याशी दोन घटका… pic.twitter.com/Q0SGyNFDqn
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 18, 2025
अजितदादांनी अशी पोस्ट शेअर करून या बापाची संघर्षगाथा मांडली. त्यांनी टपरी चालक ढवळे यांच्याशी चाय पे चर्चा केली. त्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांनी स्वतः झिजून मुलाच्या जीवनाला, त्याच्या स्वप्नांना आकार दिल्याचे सांगितले. ही संघर्षकथा आता चर्चेचा विषय ठरली आहे. तर अनेकांनी दादांचा हळवा कोपरा समोर आल्याचे म्हटले आहे. सधया राज्यात या चाय पे चर्चाची चर्चा होत आहे.