शिवी हासडली की व्हाल कंगाल, या ग्रामपंचायतीचा न्यारा ठराव, या गावाचा आदर्श कोण-कोण घेणार?

Model Village Saundale : राज्यातच नाही तर देशात काही गावात शिव्यांची लाखोली वाहण्याची प्रथा आहे. नदीच्या काठावर एकमेकांना शिवा हासडण्याची प्रथा आहे. पण या गावात तुम्ही असा प्रयत्न केला तर तुम्ही कंगाल झालाच म्हणून समजा. या ग्रामपंचायतीने तसा ठरावच घेतला आहे. या गावाचा आदर्श कोण-कोण घेणार?

शिवी हासडली की व्हाल कंगाल, या ग्रामपंचायतीचा न्यारा ठराव, या गावाचा आदर्श कोण-कोण घेणार?
शिवी द्याल तर फसाल
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 2:31 PM

राज्यातच नाही तर देशातील काही भागात शिव्या देण्याची स्पर्धा होते. काही ठिकाणी ही प्रथचा असते. एका विशिष्ट दिवशी नदीच्या काठावर दोन्ही गावातील लोक एकमेकांना हातवारे करून शिव्यांची लाखोली वाहतात. तर शिव्यावरून होणारे महाभारत तर आपण अनेक गल्ल्यांमध्ये पाहतो. शिवी देण्यावरून दोन गट भिडतात. अनेक ठिकाणी मारामारी होते. डोकी फुटतात. पण या गावात तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कंगाल झाला म्हणूनच समजा. या ग्रामपंचायतीने तसा ठरावच घेतला आहे. या गावाचा आदर्श कोण-कोण घेणार?

शिवी दिली की दंडात्मक कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधील सौंदाळा गावाने राज्यात मोठा आदर्श उभा केला आहे. हे गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेत असते. यावेळी ग्रामसभेत आई आणि बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्यात आली आहे. जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

500 रुपये दंड

सौंदाळेत झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला आणि पुरुषांनी गावामध्ये यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. जर शिव्या दिल्या तर पाचशे रुपये दंड सक्तीने आकारण्यात येईल. शिव्या देताना आईचा आणि बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शाररिक अवयवा संदर्भात शिवीगाळ करायची नाही, असा दंडक केला आहे. त्याचे उल्लंघन केल्यास आता दंड वसूल करण्यात येणार आहे.

अर्वाच्य शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो. त्यामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देताना आपल्या आई बहिणींना मुलींना आठवलं पाहिजे. त्यामुळे ग्रामपंचायतीने शिव्या देण्यासाठी बंदी घालून , महिला भगिनींचा सन्मान करण्यात येणार असल्याचं सरपंचांनी सांगितलं आहे.. माझ्या पंधरा वर्षाच्या कालावधीत या निर्णयासह अनेक निर्णयात्मक ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आले असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शरद अरगडे यांनी दिली आहे..

ग्रामपंचायतच्या कार्य काळात यापूर्वी केलेले ठराव आणि त्याची अंमलबजावणी

1) कन्यादान योजना 5000 रुपये 2) विधवा सन्मान योजना 3) पिठाची गिरणी एक रुपये किलो प्रमाणे 4) गावातील निराधार वृद्धांना ग्रामपंचायत मार्फत रोज मोफत भोजन 5) 276 घरकुल मंजूर तालुक्यात गावाला अव्वल स्थान 6) 50% दराने सलून 7) विधवा पुनर्विवाहासाठी 11000 रुपये प्रोत्साहित रक्कम 8) विधवा भाऊबीज आणि रक्षाबंधन प्रत्येकी 1000 रुपये 9) प्रत्येक दिवाळीला मानसी दीड किलो मोफत साखर 10) गावात शिवीगाळ बंदी, गावात बालविवाह सक्तीची बंदी, संध्याकाळी सात ते नऊ विद्यार्थ्यांसाठी मोबाईल बंदी 

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.