‘मला दहाव्याला बोलवा, कावळ्याच्या अगोदर मी हजर राहीन’, सुजय विखेंच्या विधानावर लंके काय म्हणाले?

सुजय विखेंच्या वक्तव्यावर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. "13 तारखेला मतदान झालं. आता मी त्यावर पडदा टाकला आहे. त्यांनी कुठलं वक्तव्य करावं हा त्यांचा अधिकार आहे. मात्र त्यांना उत्तर देणं माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाही", असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.

'मला दहाव्याला बोलवा, कावळ्याच्या अगोदर मी हजर राहीन', सुजय विखेंच्या विधानावर लंके काय म्हणाले?
सुजय विखेंच्या विधानावर निलेश लंके काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 8:39 PM

“मला दहाव्याला बोलवा. कावळ्याच्या अगोदर मी हजर राहील, असं वक्तव्य करत आमचे मित्र पहाटे चारला लंगर तोडायला जातात”, असा टोला माजी खासदार सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता लगावला होता. यावर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 13 तारखेला मतदान झालं आता मी त्यावर पडदा टाकला आहे. त्यांनी कुठलं वक्तव्य करावं हा त्यांचा अधिकार आहे. मात्र त्यांना उत्तर देणं माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाही, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. “आता मी मोकळाच आहे. मी ठरवलंय की एखादं उद्घाटन असेल, वाढदिवस असेल किंवा जागरण गोंधळ. हजर राहायचे. दहावा असेल तर लगेच सांगा, कावळ्याच्या आगोदर सुजय विखे हजर राहील. बदलेले राजकारण ओळखण्यात मी अयशस्वी ठरलो. मात्र लोकसभेनंतर मी खूप काही शिकलो”, असे मिश्किल वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी काल केलं होतं. त्यावर सुजय विखे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

“कांदा आणि दुधाला हमीभाव मिळावा यासाठी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवस आंदोलन केले होते. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत लक्षवेधी लावली आहे. त्यामुळे काय निर्णय घेतला जातो? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तर निलेश लंके यांच्या आंदोलनावेळी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जयंत पाटील यांनी आंदोलनाला भेट दिली होती. यावेळी लंके यांच्या मागण्या मार्गी लावू, असं आश्वासन देत विखे यांनी वेळ मागितला होता. तसेच उत्पादन खर्च वर दर ठरवायचे असेल तर कायदा करणे अपेक्षित असून अनुदान देण्यापेक्षा दुधाला भाव वाढून दिले पाहिजे. यासाठी मुदतवाढ मागितलं”, असं निलेश लंके यांनी सांगितले आहे.

मविआ विधानसभेला 225 जागा जिंकतील?

विधानसभेला आमच्या 225 जागा येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केलाय. यावर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली. “राज्यात शरद पवारांना इतका अभ्यास कोणाचा नाही. त्यामुळे शरद पवार जे बोलतात ते सूचक वक्तव्य असतं. ते प्रत्यक्षात देखील अंमलात आणतात, असं लंके यांनी म्हटलंय. तसेच अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीची लाट राहील”, असा विश्वास लंके यांनी व्यक्त केला आहे.

निलेश लंके पूजा खेडकर यांच्याबद्दल काय म्हणाल्या?

प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर या मागील काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे चांगल्याच चर्चेत आल्या असून याबाबत बोलताना निलेश लंके नवीन अधिकाऱ्यांची अशी वागणूक बरी नाही. त्यांनी असं वागायला नको होतं. त्यांच्या वडिलांची देखील सर्व्हिस झाली आहे. जुना असो की नवा अधिकारी असो, त्यांची वर्तवणुक चांगली असावी. अन्यथा वरिष्ठ पातळीवर याची दखल घ्यायला हवी, असं निलेश लंके यांनी म्हंटलं आहे.

Non Stop LIVE Update
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.