Sharad Pawar : रोहित पवार मंत्री होणार? पवार घराण्यातून नव्या नेतृत्वावर मोठी जबाबदारी?; शरद पवार यांचे संकेत काय?

Sharad Pawar On Rohit Pawar : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर नवीन नेतृत्वाला शरद पवार यांनी संधी दिली आहे. महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने नवीन चेहऱ्यांची चाचपणी केली आहे. आता पवार घराण्यातून नवे नेतृत्व समोर येत आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच याविषयीचे संकेत दिले आहे.

Sharad Pawar : रोहित पवार मंत्री होणार? पवार घराण्यातून नव्या नेतृत्वावर मोठी जबाबदारी?; शरद पवार यांचे संकेत काय?
पवार घराण्यातील पुढील नेतृत्वाकडे मोठी जबाबदारी
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 11:12 AM

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर नवीन नेतृत्वाला संधी मिळाली आहे. अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात येत आहे. नव्या दमाचे नेतृत्व ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी कितपत सक्षम आहे याचे प्रयोग आणि चाचपणी सुरू आहे. त्यातच आता पवार घराण्यातून नवे नेतृत्व समोर येत आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच याविषयीचे संकेत दिले आहे. रोहित पवार यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठी जबाबदार मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

रोहित पवार यांच्यावर मोठा विश्वास

पाच वर्षात या भागात काय बद्दल झाला हे तुमच्यासमोर आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळी भाग, पाणी, वीज, दळणवळणाची साधन नाही. मी विचारलं लोक खांद्यावर जबाबदारी का टाकतील, मात्र जर संकटाचा सामना करण्याची ताकद हवी ती रोहितमध्ये आहे. त्याच्यावर टीका होत आहे भूमिपुत्र पाहिजे, कसला भुमिपूत्र? तुम्ही मंत्री होतात मात्र काही केलं नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला. अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे सुद्धा वाचा

आता राज्यात महत्त्वाची जबाबदारी

रोहित पवार यांची पहिली पाच वर्ष तुमची सेवा करण्यात पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यात जातील असे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. इंदिरा गांधी नगर दक्षिणचा दुष्काळी दौरा करायला आल्या होत्या. आता चित्र पालटलं आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. रोहित पवारांनी 2700 कोटींचा निधी या मतदार संघात आणला. जलसंधारणासाठी 300 कोटी रुपये आणले, हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यांनी रोहित पवार यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केले आहे.

राम शिंदे यांच्यावर सडकून टीका

गेल्या पाच वर्षात कर्जत जामखेड मध्ये बदल झालेला आहे. दहा दहा वर्ष आमदार मंत्री असतांना तुम्ही मतदार संघात एक प्रश्न सोडवू शकले नाही, अशी खरमरीत टीका शरद पवार यांनी राम शिंदे यांच्यावर केली.पहिल्यादा निवडून आल्यानंतर मंत्री पदाची अपेक्षा करू नये. आज रोहित काम करतो त्याने देखील कधी पदाची अपेक्षा केली नाही. रोहितची पहिली पाच वर्ष ही तुमची सेवा करायची होती आणि त्या नंतरची पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी देणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. समाजाचं काम करत असतांना जे कर्तृत्व दाखवतात तेच राजकारणात टिकतात, असे त्यांनी ठाम पणे सांगितलं. उभं करायला अक्कल लागते, उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही. रोहित पवार चांगले काम करत आहे त्याला मदत करता आली नाही तर त्याच्या कामात खोडा घालू नका. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.