AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमध्ये मनोमिलन, अहमदनगरमध्ये डॅमेज कंट्रोल, सुजय विखेंसाठी राम शिंदे प्रचारात उतरणार

भाजपच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सर्वाधिक जागांवर विजय मिळावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. भाजपकडून आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राम शिंदे आणि सुजय विखे यांच्यातील मतभेद दूर करण्यात आले.

भाजपमध्ये मनोमिलन, अहमदनगरमध्ये डॅमेज कंट्रोल, सुजय विखेंसाठी राम शिंदे प्रचारात उतरणार
सुजय विखे पाटील आणि राम शिंदे यांचा फाईल फोटो
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 5:44 PM

लोकसभा निवडणुकीसाठी आता मतदान जसं जवळ येत आहे तसं महायुतीमधील मतभेद आणि जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. नाशिकच्या जागेसाठी मुंबईत सध्या खलबतं सुरु आहेत. तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांचं मनोमिलन झालं आहे. खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यातील मतभेद आता दूर झाले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला सुजय विखे पाटील आणि राम शिंदे हे उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही नेत्यांमधील मतभेद पूर्णपणे दूर झाले आहेत. ही बैठक जवळपास साडेतीन तास चालली. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तसेच लोकसभा निवडणुकीचा जोरात प्रचार करु, असं सागितलं.

राम शिंदे आणि सुजय विखे पाटील यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून मतभेद वाढले होते. दोन्ही नेते जाहीर भाषणांमधून एकमेकांवर निशाणा साधत होते. त्यामुळे भाजपमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. विशेष म्हणजे राम शिंदे यांनी अहमदनगर लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढवण्याची इच्छादेखील व्यक्त केली होती. पण पक्षाने सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यानंतर राम शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या घडामोडींची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांनी गेल्या आठवड्यात राम शिंदे यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर केली. त्यानंतर आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत राम शिंदे आणि सुजय विखे समोरासमोर होते. यावेळी दोन्ही नेत्यांमधील मतभेद दूर सारण्यात आले.

सुजय विखे काय म्हणाले?

“आमदार राम शिंदे यांनी काही मुद्दे उपस्थित केले. मतभेद म्हणण्यापेक्षा समज-गैरसमज हे मधल्या काळामध्ये झाले असतील. त्यावर सविस्तर चर्चा झाली. त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवत उमेदवारीला इच्छुक असताना भाजपचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्ये ज्या शंका कुशंका असतील त्या संदर्भात आज बैठकीत चर्चा केली. गेल्या निवडणुकीत 18 हजारांचं लीड जामखेड शहरात होतं. तर यावेळी ते 25 हजारचं लीड देतील. समन्वय करणं आवश्यक आहे आणि तो नेहमी केला गेला पाहिजे. आपण समोरच्यासोबत लढताना जर घरचे व्यक्ती तुमच्याबरोबर नसतील तर तुम्ही लढणार कसे? आता सगळेच गैरसमज दूर झाले. माझा प्रचार पूर्ण झाला. समोरचे उमेदवार नवीन आहेत. मी साडेचार वर्षापासून काम करतोय. तर त्यांना जास्त वेळ द्यावा लागेल”, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली.

राम शिंदे काय म्हणाले?

“काही प्रश्न आणि अडीअडचणी होत्या. त्यामुळे लोक, कार्यकर्त्यांचं म्हणणे ऐकून घेणं आणि त्याला उत्तर देणं हीच भाजपची लोकशाही आहे. इतर पक्षात असं होत नाही, कार्यकर्त्याला निवडणुकीच्या विश्वासात घेऊन काम केलं तर ते आणखीन वेगाने पळतात. आज तीन तास मॅरेथॉन बैठक झाली आणि खासदारांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. गेल्या वेळेपेक्षा जास्त लेडीज जामखेडमधून देण्याचा निश्चय केला आहे. भाजप पक्षाचा आदेश हा सर्वमान्य आहे. आदेश आला की पक्षाचा मावळा त्यानुसार पळतो. मी एकाच पक्षाचा जुना सदस्य आहे. गेल्या वेळेपेक्षा जास्त मतांनी आमचा खासदार निवडून येईल”, अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.