नितेश राणेंना विधानसभेत घुसून मारण्याचा इशारा, एमआयएमचा उमेदवार काय म्हणाला?

नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारु, असा इशारा नासिर सिद्दीकी यांनी नाव न घेता दिला आहे. त्यावर नितेश राणे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. "हिरव्या सापाने आम्हाला शिकवू नये", असा पलटवार नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणेंना विधानसभेत घुसून मारण्याचा इशारा, एमआयएमचा उमेदवार काय म्हणाला?
नितेश राणेंना विधानसभेत घुसून मारण्याचा इशारा, एमआयएमचा उमेदवार संभाजीनगरमध्ये काय म्हणाला?
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 10:44 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर आता राजकारण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असताना आता नवं वाकयुद्ध रंगताना बघायला मिळत आहे. यामध्ये आता एकमेकांना मारण्याचादेखील इशारा दिला जातोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता काय-काय बघायला मिळणार? याची चिंता सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. एमआयएमचे उमेदवार नासिर सिद्दीकी यांनी नाव न घेता भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा इशारा दिला आहे. नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारु, असा इशारा नासिर सिद्दीकी यांनी नाव न घेता दिला आहे. नासिर सिद्दीकी हे छत्रपती संभाजीनगर मध्यचे एमआयएमचे उमेदवार आहेत. त्यावर नितेश राणे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. “हिरव्या सापाने आम्हाला शिकवू नये”, असा पलटवार नितेश राणे यांनी केला आहे.

नासिर सिद्दीकी यांचं वक्तव्य काय?

“5 पूट 5 रुपयांवाला एक पेप्सी म्हणतो की, मशिदीत घुसून मारणार. त्यांची एवढी हिंमत वाढली आहे. मी तुम्हा सर्वांना सांगतो, विधानसभेत घुसून मारण्याची ताकद आहे फक्त त्याने गुन्हेगारी कृत्य केलं पाहिजे”, असं नासिर सिद्दीकी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला नितेश राणे यांनी देखील तिकीट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

नितेश राणे यांचं प्रत्युत्तर काय?

नासिर सिद्दीकी यांच्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. “त्याला पहिले घरात स्वस्त झोपायला सांग. नाहीतर स्वप्नातही येऊन नितेश राणे तुला नागडा करुन मारेल. तुझ्या लायकी आणि औकातीनुसार येऊन महाराष्ट्रात थोबाड उघडायचं. पाकिस्तानच्या आणि तालिबानच्या एजंट लोकांनी आमच्याकडे वाकड्या नजरेने बघितलं तर आपल्या आब्बाकडे स्वत:च्या पायावर घरी जाणार नाहीत हे लक्षात ठेवा”, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

अकबरुद्दीन ओवैसींकडून त्या 15 मिनिटांचा उल्लेख

दरम्यान, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसींकडून छत्रपती संभाजीनगर येथील सभेत पुन्हा एकदा 15 मिनिटांचा उल्लेख करण्यात आला. प्रचाराच्या वेळेचा उल्लेख करत ओवैसी यांनी वारंवार 15 मिनिटांचा उल्लेख केला. ते सातत्याने 15 मिनिट बोलत असताना त्या शब्दावर जास्त वजन देताना दिसले. यावेळी भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या लोकांमधूनही 15 मिनिटे अशी घोषणा करण्यात आली. “अरे भाई 15 मिनिटे बाकी आहेत. थोडं वाट पाहा. न ते माझा पिछा सोडतात, न मी त्यांचा. चालू आहेत, पण काय आवाज गुंजतोय”, असं अकबरुद्दीन म्हणाले. अकबरुद्दीन ओवैसी यांनी 2012 मध्ये 15 मिनिटांचा उल्लेख करत प्रक्षोभक भाषण केलं होतं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.