विमानात बॉम्बची धमकी, अखेर विमानाचे नागपुरात आप्तकालीन लँडींग, सुरक्षा तपासणीत…

Indigo Bomb Threat: बॉम्बची धमकी एका कागदाच्या तुकड्यावर मिळाली. हा कागद विमानाच्या बाथरुममध्ये मिळाला. त्यामुळे विमान नागपूरला उतरवून सुरक्षा एजन्सीने कठोर तपासणी केली. त्यात काहीच आक्षेपार्ह मिळाले नाही. त्यानंतर दुपारी दोन वाजता विमान हैदराबादकडे रवाना करण्यात आले.

विमानात बॉम्बची धमकी, अखेर विमानाचे नागपुरात आप्तकालीन लँडींग, सुरक्षा तपासणीत...
Follow us
| Updated on: Sep 01, 2024 | 3:15 PM

Indigo Bomb Threat: काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी आली होती. आता इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी आली. यामुळे मध्य प्रदेशातील जबलपूर येथून हैदराबादला जाणाऱ्या विमानाचे नागपूर विमानतळावर आप्तकालीन लँडींग करण्यात आले. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. विमानातील सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. विमान नागपूरला उतरवल्यानंतर कठोर तपासणी करण्यात आली. त्यात काहीच आढळून आले नाही. आता धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

विमान नागपुरात उतरवले

जबलपूर येथून हैदराबाद येथे जाणारी फ्लॉइट 6E 7308 मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी रविवारी मिळाली. त्यानंतर हैदराबादकडे निघालेले हे विमान नागपूर विमानतळकडे डायवर्ट करण्यात आले. नागपूर विमानतळावर विमानाचे आप्तकालीन लँडींग करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. विमानाची तपासणी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बॉम्बची धमकी एका कागदाच्या तुकड्यावर मिळाली. हा कागद विमानाच्या बाथरुममध्ये मिळाला. त्यामुळे विमान नागपूरला उतरवून सुरक्षा एजन्सीने कठोर तपासणी केली. त्यात काहीच आक्षेपार्ह मिळाले नाही. त्यानंतर दुपारी दोन वाजता विमान हैदराबादकडे रवाना करण्यात आले.

यापूर्वी मिळाली होती धमकी

22 ऑगस्ट रोजी मुंबईवरुन येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरवून तपासणी केली गेली. त्यात काहीच मिळून आले नाही. त्यावेळीही विमानाच्या शौचालयामध्ये एक टिशू पेपरवर बॉम्बची धमकी मिळाली होती. धमकी मिळालेली एअर इंडियाच्या फ्लाइट AI 657 मध्ये135 प्रवाशी होते. एअर इंडियाने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले होते की. AI 657 (BOM-TRV) मध्ये 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.30 धमकी मिळाली. त्यानंतर विमानाची लँडींग तिरुवनंतपुरम विमानतळावर सकाळी 7.36 वाजता केली गेली. त्यात काहीच आढळून आले नाही.

जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.