काम करू की सत्कार स्वीकारू?; अजित पवार भडकले!

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शीघ्र कोपी स्वभावाचं आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच दर्शन झालं. (Ajit Pawar angry on party workers in pune)

काम करू की सत्कार स्वीकारू?; अजित पवार भडकले!
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 1:20 PM

पुणे: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शीघ्र कोपी स्वभावाचं आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच दर्शन झालं. अजितदादांचा सत्कार करण्यासाठी आलेल्या या कार्यकर्त्यांवर आणि प्रवक्त्यावंर दादा डाफरले. अरे कामं करू की सत्कार स्वीकारत फिरू?, अशा शब्दांत अजितदादांनी सुनावलं. त्यामुळे मोठ्या उत्साहाने आलेल्या या कार्यकर्त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. (Ajit Pawar angry on party workers in pune)

राज्य सरकारने कॅबिनेटच्या बैठकीत गुंठेवारीचा निर्णय घेतला. अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी 10 ते 12 गावचे ग्रामस्थ आले होते. कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आल्याने अजितदादांचा पारा चढला. काही पूर्व नियोजीत बैठका आणि कार्यक्रम ठरलेले असल्याने गावकऱ्यांच्या सत्कार समारंभात वेळ गेल्यास पुढचं संपूर्ण शेड्यूल बिघडणार असल्याचं लक्षात आल्याने अजितदादांनी त्यांच्या प्रवक्त्याला बोलावले आणि थेट फायरिंग सुरू केली. एवढ्या मोठ्या प्रमाणवर गावकरी, कार्यकर्ते आले. आज सत्कार स्वीकारला तर रोजच सत्कार स्वीकारावा लागेल. मी काम करू की सत्कार स्वीकारू? असा सवाल अजितदादांनी केला. यावेळी काही गावकरीही तिथेही होते. त्यामुळे दादांचा सत्कार करण्याचा सर्वांचा अपेक्षाभंग झाला.

निवडणुकांमध्ये घड्याळ चालवा

यावेळी अजितदादांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. महापालिका निवडणुका येत आहेत. या निवडणुकांमध्ये घड्याळ चालवा. आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर भर द्या. त्यासाठी पक्षबांधणी करा. आतापासूनच कामाला लागा, असं आवाहन अजितदादांनी केलं. दरम्यान, एकीकडे पालिका निवडणुका एकत्रित लढण्यावर अजितदादा पवार भर देत आहेत. दुसरकडे कार्यकर्त्यांना निवडणुकीत घड्याळ चालवण्याचं आवाहनही करत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Ajit Pawar angry on party workers in pune)

संबंधित बातम्या:

रस्ता कधी सुरु होणार, राजेंनी हिंदी डायलॉग फेकला, म्हणाले ‘अभी के अभी’

तपास यंत्रणामागे लागताच रॉबर्ट वाड्रांना राजकारणाचे वेध; प्रियांकांच्या निर्णयाकडे लक्ष

चंद्रकांत पाटलांच्या गावात आघाडीत बिघाडी, थेट अजित पवारांनी घेतली दखल, म्हणाले…

(Ajit Pawar angry on party workers in pune)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.