अजित पवारांनी भर मंचावर मागितली सर्वांची माफी, पाहा नेमकं काय म्हणाले?

"कुणी केलं, काय केलं, त्याचा तपास लावला पाहिजे. त्या संदर्भात मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, मी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो", असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांनी भर मंचावर मागितली सर्वांची माफी, पाहा नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 5:43 PM

सिंधुदुर्गच्या मालवण येथे समुद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ला आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये शिवरायांच्या 35 फुट उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पण हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला आहे. या पुतळ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पण तरीदेखील अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आणि देशासाठी मोठं योगदान आहे. शिवरायांचा इतिहास आजही प्रत्येकाला दिशा देतो. शिवराय देशाचे आराध्य दैवत आहेत. पण या दैवताचा पुर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेवरुन राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांकडून वेगवेगळे वक्तव्ये केली जात आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचं केंद्रातील नेतृत्वदेखील नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर आता या घटनेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर मंचावर माफी मागितली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी मी माफी मागतो”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. “शिवराय आपले दैवत आहेत. शिवरायांचा पुतळा पडणं हे आपल्या सर्वांना धक्का देणारं आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “कुणी केलं, काय केलं, त्याचा तपास लावला पाहिजे. त्या संदर्भात मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, मी याबद्दल महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो”, असं अजित पवार म्हणाले.

“युगपरुष छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे दैवत आहेत. त्या दैवतांचा पुतळा वर्षाच्या आत नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सर्वांना धक्का देणारं आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “या प्रकरणात जे कुणी दोषी असतील, मग ते कुणीही असूद्यात, वरिष्ठ अधिकारी असूद्या, खालचे अधिारी असूद्या. कंत्राटदार असूद्या. त्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकलं पाहिजे”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

अजित पवार पाहा काय म्हणाले?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.