देवेंद्र फडणवीस अन् जयंत पाटील यांच्या शहरात अजित पवार यांचे लागले बॅनर

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने विविध ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहे. एका ठिकाणी अजित पवार यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला गेला आहे.

देवेंद्र फडणवीस अन् जयंत पाटील यांच्या शहरात अजित पवार यांचे लागले बॅनर
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 3:33 PM

नागपूर, सांगली | 22 जुलै 2023 : राज्याच्या सत्ताकारणात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा २२ जुलै रोजीच वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. नागपूरमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लागले आहेत. त्यामध्ये “ही दोस्ती तुटायची नाय” असा संदेश दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या शहरात अजित पवार भावी मुख्यमंत्री असा बॅनर लावण्यात आला. त्या बॅनरची चांगलीच चर्चा होत आहे.

काय आहे बॅनर

सांगलीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागले. शिवाजी मंडई आणि फौजदार गल्ली येथे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे उल्लेख केला गेला आहे. ‘इलाका किसीका भी हो…, धमका सिर्फ अजितदादा का रहेगा…’, असे बॅनरमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे सांगली जयंत पाटील यांचा जिल्हा आहे. जयंत पाटील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहे.

हे सुद्धा वाचा

नागपुरात काय केला उल्लेख

नागपुरात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. त्यात “ही दोस्ती तुटायची नाय” असा उल्लेख करत नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. “राजकारणातील ‘दादा’ अजितदादा, राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असे त्यात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले आहे. विशेष म्हणजे या होर्डिंग्जवर पहाटेच्या शपथविधीचा दोन्ही नेत्यांचा फोटो लावला आहे. तसेच शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटोही लावण्यात आला आहे.

राज्यातील राजकारणात २ जुलै रोजी हादरा बसला होता. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत आपला गट तयार केला. त्यानंतर भाजप आणि शिवसेना युतीसोबत ते आले. अजित पवार उपमुख्यमंत्री तर इतर राष्ट्रवादीतून आलेले इतर आठ जण मंत्री झाले. त्यामुळे “ही दोस्ती तुटायची नाय” असा उल्लेख करत नागपुरात बॅनर लागले आहे.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.