महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! अजित पवारांचे आर. आर. आबांवर अतिशय धक्कादायक आरोप

अजित पवार यांनी राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची उघड चौकशी व्हावी, या फाईलवर सही केली, असा मोठा आणि अतिशय धक्कादायक आरोप अजित पवारांनी केला.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! अजित पवारांचे आर. आर. आबांवर अतिशय धक्कादायक आरोप
अजित पवारांचे आर. आर. आबांवर अतिशय धक्कादायक आरोप
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 5:49 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात आता प्रचाराची रणधुमाळी जसजशी वाढत आहे, तसतशा आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या वाढणार आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सांगलीतील तासगाव येथे सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची उघड चौकशी व्हावी, या फाईलवर सही केली, असा मोठा आणि अतिशय धक्कादायक आरोप अजित पवारांनी केला. विशेष म्हणजे आपण आर. आर. आबांना अनेकदा कठीण प्रसंगात मदत केली. पण त्यांनी आपल्या विरोधातील चौकशीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. याचं आपल्याला खूप वाईट वाटल्याचं अजित पवारांनी आज भर सभेत सांगितलं.

“मी प्रत्येक वेळेस आबांना आधार दिला, प्रत्येक वेळेस मदत केली. मला एका गोष्टींचं वाईट वाटतं. तो मला म्हणाला की, माझं गृहखातं काढून घेतलं, मला गृहखातं पाहिजे. अमूक पाहिजे तमूक पाहिजे. सर्व दिलं. माझ्याबरोबर 2004 ला बीट लावली होती की, 2004 ला काँग्रेस पक्षा राष्ट्रवादीच्या जास्त जागा लावणार. त्यावेळी स्कोडा गाडीची शर्यत लागली होती. काँग्रेस पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवी कोरी स्कोडा गाडी देणार. आल्यावर त्याने मला सांगितलं. आपण शब्दाचे पक्के. जास्त जागा निवडून आल्यावर नवी स्कोडा सुपर गाडी त्याच्याघरी पाठवली. उपकार केले नाहीत. पैज लावली होती ती त्याने जिंकली. या पद्धतीने प्रत्येक वेळेस आधार दिला”, असं अजित पवार म्हणाले.

“नंतरच्या काळात आजार झाला. आम्हाला खोटं सांगितलं की, गाल सुजले. पण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. मी त्याला राजाराम बापू करखान्याच्या कार्यक्रमात तंबाखू खाऊ नको, असं सांगितलं होतं. त्याच्यावर टीका केली होती. लोकांना कॅन्सर होतात. साहेबांनाही तो आजार झाला होता. त्यामुळे गप्प बस राव. आपल्याला खूप काम करायचं आहे. मी नसलो की, गुपचूप तंबाखू चोळायचे आणि मी असलो की कुठे दादा काही नाही. पण मी माझ्याकरता सांगत नव्हतो तर मी त्याच्याकरता सांगत होतो”, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांचे आर. आर. आबांवर आरोप काय?

“हे सर्व दुर्दैवाने झालं. हे काढायची गरज नव्हती. पण नंतर माझ्यावर आरोप झाले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणाले, याच्यावर 70 हजार कोटींचा आरोप करुयात. अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते. माझ्यावर ज्यादिवशी आरोप झाला तेव्हापासून महाराष्ट्राची 1 मे 1960 ला निर्मिती होऊन ते आरोपाच्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42 हजार कोटींचा झाला आणि मला 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला म्हणाला. खर्च 42 हजार कोटी आणि भ्रष्टाचार 70 हजार कोटींचा? नाही म्हणे आकडा जितका मोठा तेवढं लोकांना वाटतं असेल बरका, झालं माझी वाटच लागली. त्यातून एक फाईल निर्माण झाली. ती फाईल गृह खात्याला जाते. त्याने त्या फाईलीवर अजित पवारांची उघड चौकशी करावी म्हणून सही केली. केसाने गळा कापायचे धंदे आहेत”, असा आरोप अजित पवारांनी केला.

“मला हेही माहिती नव्हतं. आपण पृथ्वीराज बाबांचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे राष्ट्रपती राजवट आली. त्यावेळेसचे राज्यपाल म्हणाले, या फाईलीवर मी सही करणार नाही. निवडून आलेला मुख्यमंत्री या फाईलीवर सही करेल. लोकशाही आहे. निवडणूक झाली. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार निवडून आलं. देवेंद्र फडणवीस यांनी सही केली आणि मला सांगितलं की, या इकडे, त्यांनी मला घरी बोलावलं. म्हणाले, हे बघा ही सही मुख्यमंत्र्यांकरता राहिली होती. तुमच्या आबांनी चौकशी उघड करण्याकरता सही केली आणि खरंच तिथे सही होती”, असे आरोप अजित पवारांनी केले.

पाहा अजित पवार काय-काय म्हणाले?

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....