राज्यातील राजकीय समीकरण बदलणार? शिवसेना-राष्ट्रवादीसोबत दिसतील आंबेडकर, अजित पवार यांचे नेमके संकेत काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलंय.

राज्यातील राजकीय समीकरण बदलणार? शिवसेना-राष्ट्रवादीसोबत दिसतील आंबेडकर, अजित पवार यांचे नेमके संकेत काय?
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 6:31 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलंय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीसाठी आम्हीदेखील चर्चेला तयार असल्याचं अजित पवार म्हणाले. विशेष म्हणजे एकीकडे शिवसेनेचा ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येत असल्याचं चित्र असताना अजित पवार यांनी याबाबत विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम या वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसले होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांना राजकारणात एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.

त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना आगामी निवडणुकीत आपण शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत जाऊ, असं सांगितलं. त्यामुळे राज्यात शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणार अशा चर्चांनी जोर धरला. पण या चर्चा जोर धरत असताना अजित पवार यांनीसुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आपण युतीला तयार असल्याचं मोठं विधान केलंय.

“जे समविचारी लोकं एकत्र येऊन समोरच्या सत्ताधार पक्षाचा पराभव करण्यासाठी आणि मतांची विभागणी होऊ न देण्यासाठी एकत्र येत असतील तर आमची तयारी आहे. पण फक्त एकाबाजूची तयारी असून चालणार नाही. दोन्ही बाजूने तयारी असावी लागते”, असं अजित पवार म्हणाले.

“आम्ही अनेकदा अनेकांशी चर्चा केलीय. आरपीआयमध्ये विविध पक्ष आहेत. ते चर्चा करत असतात. त्यापैकी अनेकांसोबत आम्ही आघाडी करुन निवडणुका लढवल्या. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही चर्चा करायला केव्हाही तयार आहोत”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.