Sharad pawar : दोघांचे स्वभाव दोन टोकाला, मग मनं जुळतात कुठे? शरद पवारांविषयी बोलताना अजित पवारांचा कंठ दाटला

शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवारांचा कंठ दाटून आला. त्यामुळे पुन्हा एकदा ही काका पुतण्याची जोडी पुन्हा चर्चेत आली आहे.

Sharad pawar : दोघांचे स्वभाव दोन टोकाला, मग मनं जुळतात कुठे? शरद पवारांविषयी बोलताना अजित पवारांचा कंठ दाटला
Sharad pawar And Ajit pawar
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 8:49 PM

शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवारांचा कंठ दाटून आला. तशी महाराष्ट्राच्या राजकारणाला काका-पुतण्या जोडीची परंपरा राहिलीय. काकांच्या पावलांवर पाऊल टाकत पुतण्यांनी राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंसारखं वक्तृत्व धनंजय मुंडेंकडे आहे. मुंडेंप्रमाणेच माणसं जोडण्याची कलाही धनंजय मुंडेंना अवगत आहे. इकडे बाळासाहेब ठाकरेंसारखीच बोलण्याची लकब, आणि शब्दांचे घाव घालण्यात राज ठाकरे माहिर आहेत. मात्र हे दोन्ही काका-पुतणे स्वभावानं, कार्यपद्धतीनं आणि एखाद्या प्रश्नाकडे बघण्याच्या दृष्टीकोनानं दोन वेगवेगळ्या टोकांवर आहेत.

दोघांचे स्वभाव टोकाचे भिन्न

असं म्हणतात की अजित पवारांचा स्वभाव म्हणजे ”एक घाव, दोन तुकडे” करण्यासारखा आहे आणि शरद पवारांचा स्वभाव म्हणजे त्यांनी नेमका घाव केलाय, की मलम लावलाय? हे कोडं पडावं यासारखा. एखादं काम होणार नसेल, तर अजित पवार स्पष्ट त्या व्यक्तीच्या तोंडावर नाही म्हणून सांगतात. मात्र शरद पवारांचा कल, एखाद्याचं काम होणार नसेल, तरी तो व्यक्ती तुटू नये, त्याला वाईट वाटू नये, याकडे जास्त राहतो. राजकारणात भांड्याला भांड लागतं. घरा-दारात मतभेदही होतात. मात्र वैयक्तिकरित्या अजित पवार आणि शरद पवार यांनी कधीही दोघांमधल्या मतभेदांना हवा दिली नाही. 4 दिवसांच्या सरकारवरुन देशभर गहजब झाला. मात्र त्यादिवशी नेमकं काय घडलं, यावर आजवर ना अजित पवार बोलले आहेत आणि ना ही शरद पवार, त्याआधी जेव्हा अजित पवार नॉट रिचेबल होऊन परतले होते, तेव्हा सुद्धा शरद पवारांना मिळालेल्या ईडीच्या नोटीशीवर अजित पवारांना भावूक होताना महाराष्ट्रानं पहिल्यांदा पाहिलं.

चिवट काका, स्पष्टवक्ता पुतण्या

शरद पवारांमधला चिवटपणा आणि अजित पवारांमधला स्पष्टवक्तेपणा, या दोन्ही गोष्टी त्यांच्यातले गुण आहेत. पण शरद पवार जर स्टेजवर असतील, आणि त्यांच्यासमोर बोलताना कुणी लाईन क्रॉस केली असेल, तर अजित पवार त्यावर आवर्जून बोलतात. मग भलेही बोलणारा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असो, किंवा मग खुद्द अजित पवारांचा भाऊ असो. अजित पवार प्रत्येक सभेत नेहमी पवारांच्या मेहनतीवर बोलतात आणि शरद पवार अजित पवारांच्या नियोजनबद्ध कारभारावरही बोलतात

शरद पावारांची आजही आदरयुक्त भिती

राजकारणातले मतभेद जरुर असतील. एखाद्या विषयावर एकाच कुटुंबात दोन मतंही होतात. मात्र साठी ओलांडलेल्या पुतण्याच्या मनात, काकाविषयी आजही आदरयुक्त भीती आहे. आणि वयाची ऐंशी ओलांडलेले पवार, फक्त शरिरानं नाही, तर बुद्धीनंही तितकेच तल्लख आहेत. पत्रकार परिषदेत एखाद्या गुगली प्रश्नाला पवार आजही चटकन ओळखतात, कुठल्या प्रश्नाला टाळायचं आहे, आणि कोणत्या उत्तराला हायलाईट करायचं, हे पवारांना पुरेपूर कळतं. महाराष्ट्र आणि देशाचा इतिहास बघितला, तर काका-पुतण्याच्या वादांमुळे पक्षात यादवी माजल्याचे दाखले आहेत. मात्र ही जोडी किमान या घडीपर्यंत तरी एकत्रित आहे. राजकारण सोडून द्या, पण एक कुटुंब म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला या काका-पुतण्यामधल्या नात्याचा हेवा वाटायला हवा.

Goa : गोव्यात टोमॅटो, पेट्रोलपेक्षा बिअर स्वस्त मिळतेय, कारण काय? वाचा सविस्तर

Breaking : 10वी सोबतच 12वी बोर्ड परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास शाळांना मुदतवाढ

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवणार, सरपंच परिषद आक्रमक

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.