मग मुख्यमंत्री तरी कशाला गप्प बसतील, राणेंची टीका, अजित पवारांची बारामतीच्या सभेत टिप्पणी

अजित पवार बारामतीच्या सभेत बोलत होते. काल सिंधुदुर्गमध्ये विमानतळ उद्घाटन झालं. मी सगळं विकासकामांबद्दल बोललो. विमानतळ झालं हे काही एकट्यादुकट्याचं काम नाही. 25 वर्षे पाठपुरावा केला आणि आता हे नेते उठले. भाषण हाणलं. मग मुख्यमंत्री तरी गप्प कशाला बसतील, असं म्हणत अजित पवारांनी नारायण राणेंवर प्रहार केलाय.

मग मुख्यमंत्री तरी कशाला गप्प बसतील, राणेंची टीका, अजित पवारांची बारामतीच्या सभेत टिप्पणी
AJIT PAWAR
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 8:37 PM

बारामतीः सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. दोन्ही नेते एका मंचावर आल्यानं एकमेकांना कोपरखळी मारण्याची संधी दोघांनीही सोडली नाही. आता त्याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नारायण राणेंना टोला लगावलाय.

25 वर्षे पाठपुरावा केला आणि आता हे नेते उठले

अजित पवार बारामतीच्या सभेत बोलत होते. काल सिंधुदुर्गमध्ये विमानतळ उद्घाटन झालं. मी सगळं विकासकामांबद्दल बोललो. विमानतळ झालं हे काही एकट्यादुकट्याचं काम नाही. 25 वर्षे पाठपुरावा केला आणि आता हे नेते उठले. भाषण हाणलं. मग मुख्यमंत्री तरी गप्प कशाला बसतील, असं म्हणत अजित पवारांनी नारायण राणेंवर प्रहार केलाय. तेही काळा तिटा लावायचाय म्हणाले. जशाला तसं उत्तर दिलं. पवारसाहेबांची आम्हाला शिकवण आहे. अनेकजण विरोधकांना सल्ला द्यायचे की पवारसाहेबांवर बोलू नका ही संस्कृती असल्याचंही अजित पवारांनी अधोरेखित केलंय.

सिंधुदुर्गाचा विकास मीच केला

चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी तब्बल 12 वर्षांनंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर आले होते. यावेळी मंचावर राणेंनी सिंधुदुर्गचा विकास मीच केल्याचा दावा केला. 1990 साली बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. तुझी सिंधुदुर्गाला गरज आहे म्हणाले. मी आलो आणि निवडून आलो. त्यापूर्वी मी कणकवलीच्या चारपाच गावांपर्यंत मर्यादित होतो. मी या जिल्ह्यात फिरलो. तिथे प्यायला पाणी नव्हते, रस्ते नव्हते. गावाचे रस्ते सोडा, हायवेही बरोबर नव्हते. शाळा असले तर वर्ग नाही, वर्ग असले तर शिक्षक नाही ही अवस्था होती. अनेक गावात वीजही नव्हती. इथली मुलं शिकली. मुंबई-पुण्यात नोकरीला यायचे. मुंबईच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेला हा जिल्हा होता. मी या जिल्ह्याचा विकास केला. मी सांगतो. पण हे लोकच ठरवतील. अडीअडचणीला मी धाऊन गेलो. उद्धवजी, मी बाळासाहेबांच्या प्रेरणेने हे काम केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडं उगवतात

विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनीही नारायण राणेंवर पलटवार केला होता. कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडं उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. नारायणराव, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नाहीत, हे खरंच आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी तेव्हाच अशा लोकांना शिवसेनेतून बाहेर काढले होते, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं बोलं. खोटं बोललेलं मला चालणार नाही. खोटं बोलशील तर गेट आऊट. हे त्यांनी दाखवलंय. असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले होते. आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सूक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करून द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या

दुकाने सुरुच ठेवणार, काळ्या फिती बांधून लखीमपूर खेरी घटनेचा निषेध, पुण्यात व्यापाऱ्यांचा पवित्रा, बंद यशस्वी होणार ?

Video | ITच्या धाडीनंतर पहिलाच बारामती दौरा, महिला म्हणतात “तुमचं काम एक नंबर,” अजितदादांच्या डोळ्यात अश्रू तरळले

दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.