‘आम्ही मधल्या काळात मविआमध्ये होतो; आम्ही सत्तेला हापापले नाही’, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
"आम्ही सत्तेला हापापले नाही. अहो सत्ता येते आणि जाते. आम्ही यशवंतराव-शिव-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा सोडली नाही. आम्ही सरकारमध्ये गेलो नसतो तर योजना तुम्हाला देता आली नसती", असं अजित पवार येवल्यात भाषणात म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर येवल्यात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. “आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आज काम करत आहोत. आम्ही मधल्या काळात मविआमध्ये होतो. मग ते सरकार पडले. आमदारांनी आम्हाला सांगितलं की, आपण सरकारमध्ये जायला हवे. कारण आपल्याला विकास करायचा आहे. आम्ही सत्तेला हापापले नाही. अहो सत्ता येते आणि जाते. आम्ही यशवंतराव-शिव-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा सोडली नाही. आम्ही सरकारमध्ये गेलो नसतो तर योजना तुम्हाला देता आली नसती”, असं अजित पवार म्हणाले.
यावेळी अजित पवार यांच्याकडून जनसन्मान यात्रेऐवजी जन स्वराज्य यात्रा असा उल्लेख करण्यात आला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिव स्वराज्य यात्रा सुरु झाली आहे. तर एकीकडे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. पण अजित पवार यांच्याकडून भाषणात जन स्वराज्य यात्रा असा उल्लेख करण्यात आला.
‘आम्हाला लोकसभेला झटका दिला, तो आम्ही मान्य केला’
“आमच्या सरकारने आज कोट्यवधी रुपयांची योजना आणली आहे. आम्ही मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा सोडविला. मुलींना शिकता येत नव्हतं म्हणून आत्महत्या होत होत्या. आता सर्व फी मोफत केली. आम्ही कुणाचं अनादर केला नाही. आम्ही जनसेवक आहे. आम्ही मालक आहोत. तुम्हाला बाबासाहेबांच्या घटनेने अधिकार दिला आहे. कोणाचं बटण दाबायचं हे तुम्ही ठरविता. आम्हाला लोकसभेला झटका दिला आहे. तो आम्ही मान्य केला आहे आणि त्या चुका शोधून आम्ही समोर आले आहोत”, असं अजित पवार म्हणाले.
“विणकर यांच्या समजाच्या समस्या सामोरे आल्या आहेत. त्यात कर्ज, जागा लूट अशी अनेक गोष्टी आहेत. या समस्य आम्ही लक्षात घेऊ. आम्ही हे वस्तूद्योग मार्फत सोडवू. आम्ही त्यात काम केली आहे. आम्ही ५ लाख रोजगार निर्माण करण्याचं लक्ष आहे. आपण अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि तांत्रिकरणाला आम्ही भर देत आहोत. कौशल्य वाढीवर भर आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
“आम्हीही बैठक लाऊ. विणकरसाठी आम्ही काय करायचं हे शोधू आणि मार्ग काढू. मी आव्हान करत आहे. आम्ही पुण्यात कार्यक्रम घेतला आहे. राष्ट्रवादीच्या मार्फत हा कार्यक्रम घेतला आहे. तिथे सर्व पक्षाचे लोक असतील”, असं अजित पवार म्हणाले.