Ajit Pawar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अजित पवारांची विधानसभेत महत्त्वाची माहिती

Ajit Pawar : "अनुदानीतचा एक वेगळा विषय असू शकतो. 1 नोव्हेंबरपूर्वी जाहीरात निघालेल्या, शासकीय सेवेत रुजू झालेल्या जुन्या निवृत्ती वेतनाचा पार्याय देण्याबाबत हो असं उत्तर दिलं आहे. जुन्या निवृत्ती वेतनाबाबत अमलबजावणी कधी करणार?"

Ajit Pawar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अजित पवारांची विधानसभेत महत्त्वाची माहिती
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 11:47 AM

आज जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात विधानसभेत चर्चा झाली. यामध्ये ठाण्याचे आमदार संजय केळकर, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, वांद्रयाचे भाजपा आमदार आशिष शेलार सहभागी झाले होते. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलीं. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहेत याची माहिती द्यावी, असं संजय केळकर म्हणाले. “शासन मान्यता अनुदान प्राप्त ज्या संस्था आहेत, त्यांना शंभर टक्के अनुदान दिलं जातं. त्यास अनुदानित संस्था असं संबोधलं जातं, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. संघटना सुप्रीम कोर्टात गेलेल्या आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. संघटनांनी अपील केलेलं आहे. सुप्रीम कोर्टात जो निकाल लागेल, तो याचिकाकर्त्यांना ऐकावा लागेल आणि सरकारलाही ऐकावा लागेल” असं अजित पवार म्हणाले.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, “अनुदानीतचा एक वेगळा विषय असू शकतो. 1 नोव्हेंबरपूर्वी जाहीरात निघालेल्या, शासकीय सेवेत रुजू झालेल्या जुन्या निवृत्ती वेतनाचा पार्याय देण्याबाबत हो असं उत्तर दिलं आहे. जुन्या निवृत्ती वेतनाबाबत अमलबजावणी कधी करणार?” त्यावर अजित पवार म्हणाले की, “रिटायर झाल्यानंतर ते सुरु होणार. बॅच 2030 ला रिटायर होणार आहे. नागपूर अधिवेशनात चर्चा झाली. पेन्शन देता येत नसेल, तर दहा टक्के कर्मचाऱ्यांनी भरायचे आणि 14 टक्के सरकार भरेल असा निर्णय झाला. याला कर्मचारी संघटनांनी मान्यता दिली आणि सरकारने मान्यता दिली”

‘आम्ही सहानभूती पूर्ण निर्णय देऊ’

“आता प्रश्न राहिला आहे, तो जिल्हा परिषदांचा. त्यांचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे आलेला आहे. जिल्हा परिषदेचा कर्मचारी हा सरकारचा भाग आहे, त्यामुळे तो निर्णय देखील घेण्याचा विचार आहे. यामुळे किती भार पडेल याची माहिती घेतली आहे आणि फाईल देखील मागवली आहे. प्रस्ताव आल्यानंतर आम्ही सहानभूती पूर्ण निर्णय देऊ” असं अजित पवार म्हणाले.

‘अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’

बाळासाहेब थोरात म्हणाले की, जुन्या पद्धतीने पेन्शन द्यावी अशी मागणी होत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, “जेव्हा निर्णय झाला होता, तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. आम्ही घेतलेल्या निर्णयाची केंद्र सरकारने माहिती घेतली. सरकार या बाबत सकारात्मक आहे. तीन लोकांची कमिटी नेमली होती” “महायुतीचे सरकार अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना न्याय देणारं हे सरकार आहे” असं अजित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ.
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या.
भर सभागृहात शिवीगाळ करणं आलं अंगाशी, अंबादास दानवेंवर मोठी कारवाई
भर सभागृहात शिवीगाळ करणं आलं अंगाशी, अंबादास दानवेंवर मोठी कारवाई.
ज्यांनी जीवन संपवलं ते... संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
ज्यांनी जीवन संपवलं ते... संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?.
हिजाबनंतर आता काँलेजमध्ये जीन्स, टी-शर्टवर बंदी, कॉलेजचा नवा नियम काय?
हिजाबनंतर आता काँलेजमध्ये जीन्स, टी-शर्टवर बंदी, कॉलेजचा नवा नियम काय?.
दक्षिण आफ्रिकेला लोळवणाऱ्या टीम इंडियाला वादळानं बार्बाडोसमध्ये रोखलं
दक्षिण आफ्रिकेला लोळवणाऱ्या टीम इंडियाला वादळानं बार्बाडोसमध्ये रोखलं.
मुंबईसह 'या' भागात 'कोसळधार', महाराष्ट्रासाठी IMD चा इशारा काय?
मुंबईसह 'या' भागात 'कोसळधार', महाराष्ट्रासाठी IMD चा इशारा काय?.