…आणि अजितदादांच्या एका फोनमुळे जालिंदर काकांवर उपचार, पवारांचं हळवं रुप पुन्हा जगासमोर

उपमुख्यमंत्री अजित पवार स्वभावाने जितके कडक आहेत तितकेच संवेदनशील आणि हळवे आहेत (Ajit Pawar getting emotional for Jalinder Shendge)

...आणि अजितदादांच्या एका फोनमुळे जालिंदर काकांवर उपचार, पवारांचं हळवं रुप पुन्हा जगासमोर
Ajit pawar
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 2:27 PM

बारामती (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार स्वभावाने जितके कडक आहेत तितकेच संवेदनशील आणि हळवे आहेत. याची प्रचिती देणारा एक प्रसंग नुकताच घडला. लहानपणापासून पवार कुटुंबियांच्या घरी काम करणारे जालिंदर शेंडगे यांची तब्येत बरी नसल्याचं अजित पवारांना समजलं. त्यांच्यावर उपचार सुरु झाल्याचं समजल्यावरच अजित पवार यांच्या चेहऱ्यावरचा तणाव निवळला. अजित पवारांच्या फोनमुळे शेंडगे कुटुंबियांनाही आधार मिळाला. त्याचाच आढावा घेणारा हा विशेष वृत्तांत (Ajit Pawar getting emotional for Jalinder Shendg).

जालिंदर शेंडगे वयाच्या सोळाव्या वर्षापासून अजित पवारांच्या घरी काम करतात. लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपल्यानं अजित पवारांचे वडील अनंतराव पवार आणि आई आशाताई पवार यांनीच त्यांचा सांभाळ केला. त्यामुळे जालिंदर शेंडगे यांचे पवार कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध राहिलेत. अगदी अजित पवारांना शाळेत सायकलवर नेण्यापासून ते घरातील सर्व कामे जालिंदर शेंडगे करायचे. त्यांना पवार कुटुंबियांनी कधी अंतरच दिलं नाही. अगदी त्यांची हृदय शस्त्रक्रियाही अजितदादांनीच केली.

दोन दिवसांपूर्वी जालिंदर शेंडगे यांना अस्वस्थ वाटू लागलं. चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांचा मुलानं अजित पवारांना फोन करत जालिंदर शेंडगे हे गंभीर असल्याचं सांगितलं. कार्यक्रमात असलेल्या अजित पवारांनी तातडीने फोन करत त्यांच्या उपचाराची सोय केली. काहीही झालं तरी जालिंदर बरा झाला पाहिजे, अशा सक्त सूचना पवारांनी दिल्या.

आपल्या लहानपणापासूनच सोबत राहिलेले जालिंदर शेंडगे आजारी आहेत हे समजल्यावर अजितदादांची घालमेल सुरु होती. अखेर त्यांच्यावर उपचार सुरु झाल्यावरच ते तणावमुक्त झाले. अजित पवारांनी केलेल्या सहकार्यामुळेच आपल्या पतीला तातडीने उपचार मिळून त्यांचा जीव वाचल्याचं जालिंदर शेंडगे यांच्या पत्नी शोभा शेंडगे यांनी सांगितलं.

अजित पवारांनी सूचना दिल्यानंतर बारामती हॉस्पिटलमध्ये जालिंदर शेंडगे यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. शेंडगे यांना रुग्णालयात आणल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांची परिस्थिती लक्षात घेवून येथील डॉक्टरांच्या टिमने शर्थीचे प्रयत्न करीत त्यांच्यावर उपचार केले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉ. निती महाडीक यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि शिस्तप्रिय नेते म्हणून सर्वश्रुत आहेत. एखादी गोष्ट पटली नाही तर लगेच संबंधितांना आपल्या कडक भाषेत सुनावणारे, कोणाचाही मुलाहिजा न बाळगता जे असेल ते तोंडावर बोलणारे अजितदादा सगळ्यांनीच पाहिलेत. पण अजित पवार जितके कडक वाटतात, त्यापेक्षा अधिक संवेदनशील आणि हळवे आहेत हेच या प्रसंगावरुन अनुभवायला मिळतं.

संबंधित बातमी : “काहीही करा, आमच्या जालिंदरला वाचवा”; करारी, आक्रमक अजितदादा जेव्हा भावुक होतात…! 

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.