भाजपची यादी जाहीर होताच हा आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर

lok sabha election 2024 ncp sharad pawar and ajit pawar | अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना लोकसभा निवडणूक लढवयाची आहे. काही दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची ऑफर दिली होती. आता निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत.

भाजपची यादी जाहीर होताच हा आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर
sharad pawar and ajit pawarImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 8:27 AM

कुणाल जयकर,अहमदनगर | 14 मार्च 2024 : भारतीय जनता पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. ७२ उमेदवारांच्या या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे आहेत. या यादीनंतर काही ठिकाणी बंडखोरीचे सूर उमटत आहेत. जळगावात रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्याने माजी आमदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे समर्थक नाराज झाले आहेत. त्यांनी हरिभाऊ यांचे चिरंजीव अमोल जावळे यांना उमेदवारी न दिल्यामुळे भाजपचा राजीनामा देण्याची मोहीम सुरु केली आहे. परंतु भाजपच्या यादीचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर झाला आहे. भाजपने अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे ही जागा भाजपकडे गेली आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके नाराज झाले आहे. त्यांची वाटचाल शरद पवार गटाकडे सुरु झाली आहे. गुरुवारी त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

निलेश लंके नाराज

निलेश लंके यांना लोकसभा निवडणूक लढवयाची आहे. काही दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची ऑफर दिली होती. त्यानंतर निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु निलेश लंके यांनी नकार दिला होता. आता शरद पवार यांच्या उपस्थित त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. निलेश लंके यांचे ‘मी अनुभवलेले कोव्हीड’ या पुस्तकाचे प्रकाशन आज होणार आहे. हे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी जाहीर होणार

आमदार निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काल भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच त्यांनी शरद पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज या प्रवेशासोबतच त्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देखील मिळण्याची शक्यता आहे.मागील अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होत्या.

हे सुद्धा वाचा

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अहमदनगर शहर,श्रीगोंदा, पारनेर ,शेवगाव- पाथर्डी कर्जत- जामखेड, राहुरी (काही भाग) असे विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदार संघात राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. भाजपचे 2 आहेत. यामुळे या मतदार संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येते. परंतु राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर दोन आमदार अजित पवार यांच्यासोबत तर दोन आमदार शरद पवार यांच्याकडे गेले आहेत.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.