AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना अजित पवार यांच्याकडून उजाळा, अर्ज भरून फोन बंद करून ठेवण्याचा किस्सा काय ?

अर्ज भरून फोन बंद करून ठेवण्याचा सल्ला अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांना दिला होता, त्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून अजित पवार यांच्या मदतीने लक्ष्मण जगताप यांनी चंदू काका जगताप यांचा पराभव केला होता.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना अजित पवार यांच्याकडून उजाळा, अर्ज भरून फोन बंद करून ठेवण्याचा किस्सा काय ?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 2:53 PM

पिंपरी चिंचवड : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या घरी सांत्वनपर भेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. पिपळे गुरव येथील त्यांच्या निवस्थानी जाऊन अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. खरंतर अजित पवार आणि लक्ष्मण जगताप यांच्यातील मैत्री सर्वश्रुत होती. त्यामुळे अजित पवार आणि लक्ष्मण जगताप यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. विशेष म्हणजे लक्ष्मण जगताप हे अजित पवार यांच्यामुळे दोनदा आमदार झाले होते. अजित पवार यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहत असतांना जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे. 2004 साली विधान परिषदेत अपक्ष उमेदवारी देत कॉँग्रेसच्या चंदू काका जगताप यांना पराभूत केल्याची आठवण सांगतली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर फोन बंद करून ठेवण्याचा सल्ला दिल्याचे अजित पवार यांनी सांगतिलं आहे. आठवणींना उजाळा देत असतांना अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप आज आपल्यात नाही याचं दु:खं बोलून दाखवलं आहे.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली आहे. त्यावेळी अजित पवार यांनी आठवणींना उजाळा दिला आहे.

लक्ष्मण जगताप यांचे दुर्धर आजारामुळे निधन झाले असून त्यांचे आणि अजित पवार यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जात असायचे.

हे सुद्धा वाचा

राजकीय जीवनाचा प्रवास करत असतांना नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर आणि मग आमदार असा लक्ष्मण जगताप यांचा प्रवास आहे.

यातील दोन वेळेस आमदार झालेल्या लक्ष्मण जगताप यांच्या विजयात अजित पवार यांचा मोठा वाटा होता, त्यावेळी लक्ष्मण जगताप यांनी तो बोलून दाखविला होता.

2004 मध्ये हवेली मतदार संघाचे तिकीट लक्ष्मण जगताप यांना नाकारले होते, त्यावेळी त्यांना शरद पवार आणि अजित पवार यांनी विधानसभेची उमेदवारी देऊ असा शब्द दिला होता.

2004 मध्ये पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा कॉंग्रेसकडे होती पण त्यावेळी आघाडीधर्म न पाळता अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितला होता.

अर्ज भरून फोन बंद करून ठेवण्याचा सल्ला अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांना दिला होता, त्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून अजित पवार यांच्या मदतीने लक्ष्मण जगताप यांनी चंदू काका जगताप यांचा पराभव केला होता.

2009 मध्येही अजित पवार यांनी कॉंग्रेसच्या भाऊसाहेब भोईर यांना मदत न करता त्यांनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगून निवडून आणले होते, त्यामुळे अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांची राजकारणापलिकडची मैत्री ओळखली जाते.

हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.